शतकपूर्ती झालेले चाळीसगावचे चर्च
By Admin | Published: December 24, 2016 02:26 PM2016-12-24T14:26:51+5:302016-12-24T14:26:51+5:30
१०० वर्षापूवीची ब्रिटीशकालीन चर्च इमारत येथे आजही दिमाखात उभी आहे. या ठिकाणी अनेक वर्षापासून नियमीतपणे प्रार्थना सभा घेतली जात आहे
>ऑनलाइन लोकमत
चाळीसगाव, दि. 24 - १०० वर्षापूवीची ब्रिटीशकालीन चर्च इमारत येथे आजही दिमाखात उभी आहे. या ठिकाणी अनेक वर्षापासून नियमीतपणे प्रार्थना सभा घेतली जात आहे. ख्रिस्ती बांधव एकत्रित येवून गुण्यागोविंदाने विविध कार्यक्रम साजरे करतात. नाताळही मोठ्या उत्साहाने साजरा होतो. .
शहराच्या स्टेशन रोडवर ही इमारत १८९५ रोजी बांधण्यात आली होती. ब्रिटीश सरकार या इमारतीचा उपयोग प्रार्थना सभेसाठी करीत होते. काही वर्षानंतर परदेशी मिशनरी बांधवांकडून अलायन्स मिशन राबवले जात होते. त्याकाळी चाळीसगाव ५-७ ख्रिस्ती समाज कुटुंबांचे वास्तव्य होते. सुरुवातीला या परिसरात मुलांचे होस्टेल व जीवन प्रकाश पवित्र शास्त्र याविषयासाठी पत्रव्यवहार शाळा सुरु झाली. जवळपास ४० वर्षे ही शाळा सुरु होती. नंतर ती पुणे जिल्ह्यात हलविण्यात आली. सुरुवातीला चर्चची देखभाल व विविध उपक्रम एस.के.बारीस पाहात असत. नंतर अनिल जामनिक हे काम पाहात आहेत. सध्या १५-२० ख्रिस्ती समाजबांधवांचे येथे वास्तव्य आहे. दर रविवारी सकाळी साडेनऊ वाजता नियमित प्रार्थनासभा होते. यानिमित्ताने ख्रिस्ती समाजबांधव एकत्रित येतात. या इमारत परिसरात गुड शेफर्ड अकादमी सुरु करण्यात आली आहे. या शाळेत २५ डिसेंबरपासून विविध स्पर्धा व कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. नाताळ निमित्त चर्च व परिसरात गेल्या आठवड्यापासून रंगरंगोटी सजावट रोषणाई करण्यात आली आहे. २४ रोजी मध्यरात्रीपासून कार्यक्रमास प्रारंभ होणार आहे. २५ रोजी दिवसभर गीत प्रवचन, रात्री येशू ख्रिस्त यांच्या जन्माविषयी गीते व भक्ती आराधना होणार आहे.