कोथिंबीर, हिरवी मिरची, वांगे तेजीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2019 11:50 AM2019-04-19T11:50:49+5:302019-04-19T11:51:27+5:30

टमाट्याचे भाव गडगडले

Cilantro, green chilli, eggplant fast | कोथिंबीर, हिरवी मिरची, वांगे तेजीत

कोथिंबीर, हिरवी मिरची, वांगे तेजीत

googlenewsNext

जळगाव : उन्हाळ््यामुळे भाजीपाल्याची आवक दिवसेंदिवस घटत असून त्यांचे भाव वाढत आहे. यात कोथिंबीर, हिरवी मिरची, वांगे यांचे भाव तर जवळपास दुपटीने वाढले असून इतर भाज्याही ‘भाव’ खात आहेत. दुसरीकडे भर उन्हाळ््यात टमाट्याचे भाव गडगडले आहे.
गेल्या वर्षी पाऊस कमी झाल्याने सर्वच पिकांवर त्याचा परिणाम झाला असून कडधान्याची आवक घटल्याने त्यांचेही भाव वाढत आहे. त्यात गेल्या काही दिवसांपासून भाजीपाल्यांची आवक घटल्याने त्यांचे भाव वाढत आहे. या आठवड्यात तर कोथिंबीर, हिरवी मिरची, वांगे यांच्या भावात जवळपास दुपटीने तेजी आली आहे.
यामध्ये दैनंदिन वापरात येणारी कोथिंबीर सर्वाधिक महागली आहे. गेल्या आठवड्यात कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये २००० ते ५५०० रुपये प्रती क्विंटलने खरेदी झालेली कोथिंबीर या आठवड्यात थेट ४००० ते ९००० रुपये प्रती क्विंटलवर पोहचली आहे. किरकोळ बाजारात तर कोथिंबीरने प्रती किलोसाठी शंभरी पार केली आहे. कोथिंबीरच्या दर्जानुसार किरकोळ बाजारात हे भाव असून ८० ते १२० रुपये प्रती किलोने ती विक्री होत आहे.
कोथिंबीर खालोखाल वांग्याचे भाव वाढले असून गेल्या आठवड्यात कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ५०० ते ११०० रुपये प्रती क्विंटल असलेल्या वांग्याचे भाव या आठवड्यात ८०० ते २२०० रुपये रुपये प्रती क्विंटलवर पोहचले आहे. किरकोळ बाजारात ते दर्जानुसार ३० ते ७० रुपये किलोने विक्री होत आहे.
घरासह हॉटेल, नाश्त्याचे दुकान या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वापरात येणारी हिरवी मिरचीदेखील अधिक ‘तेज’ झाली आहे. गेल्या आठवड्यात कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये १२०० ते ३५०० रुपये प्रती क्विंटल असणारी हिरव्या मिरचीचे भाव या आठवड्यात २००० ते ५००० रुपये प्रती क्विंटलवर पोहचले आहेत. त्यामुळे किरकोळ बाजारतही मध्यम दर्जाची मिरची ८० ते १०० रुपये प्रती किलोने विक्री होत आहे.
टमाट्याचे भाव निम्म्यावर
एरव्ही हिवाळ््यामध्ये टमाट्याची आवक वाढून त्यांचे भाव मोठ्या प्रमाणात कमी होतात. मात्र यंदा भर उन्हाळ््यात टमाट्याचे भाव निम्म्यावर आले आहेत. गेल्या आठवड्यात कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये १००० ते १७५० रुपये प्रती क्विंटल असलेल्या टमाट्याचे भाव या आठवड्यात ५०० ते १००० रुपये प्रती क्विंटलवर आले आहेत. किरकोळ बाजारात टमाटे १५ ते २० रुपये किलोने विक्री होतआहेत.सध्याकॉलन्यांमध्येहीटमाटेविक्रीच्याहातगाड्यादिसतआहेत.

Web Title: Cilantro, green chilli, eggplant fast

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव