जळगावच्या बाजारपेठेत कोथिंबीरचे भाव वधारले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2019 12:09 PM2019-06-28T12:09:33+5:302019-06-28T12:11:15+5:30
दर १००० ते ३००० रुपये प्रती क्विंटलने वाढले
जळगाव : जळगावच्या बाजारपेठेत आवक घटत असल्याने कोथिंबीरचे भाव वाढत आहे. जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गेल्या आठवड्याच्या तुलनेत कोथिंबीरचे दर १००० ते ३००० रुपये प्रती क्विंटलने वाढले आहेत, अशी माहिती बाजार समितीचे भाजीपाला विभाग प्रमुख वासुदेव पाटील यांनी दिली.
गेल्या आठवड्यात २००० ते ४००० रुपये प्रती क्विंटल असलेल कोथिंबीरचे दर हे ३००० ते ७००० रुपये प्रती क्विंटल झाले आहेत. गेल्या आठवड्यात वधारलेल्या वांग्याच्या दरात घसरण झाली असून इतर भाज्यांचे दर सध्या स्थिर असल्याने दिलासा मिळाला आहे. कांद्याची आवक घटली असून त्याचे दरही ३५० ते १२५० रुपये प्रती क्विंटलवर पोहचले आहेत.
या सोबतच कारले २००० ते ४००० रुपये प्रती क्विंटल या दराने बाजार समितीत खरेदी झाले. इतर भाज्यांचे दर हे पुढील प्रमाणे आहे. बटाटे ५०० ते ११०० रुपये प्रती क्विंटल, टमाटे १००० ते २००० रुपये प्रती क्विंटल, भेंडी १५०० ते ३५०० रुपये प्रती क्विंटल, कैरी १००० ते ३००० रुपये प्रती क्विंटल, खिरा ८०० ते १५०० रुपये प्रती क्विंटल, फूलकोबी - २००० ते ४५०० रुपये प्रती क्विंटल, गवार - ३००० ते ७००० रुपये प्रती क्विंटल, लिंबू २१०० ते ३००० रुपये प्रती क्विंटल, पानकोबी ७०० ते १२०० रुपये प्रती क्विंटल, मेथी ३००० ते ५५०० रुपये प्रती क्विंटल, पालक २५०० रुपये प्रती क्विंटल, अद्रक ३३०० ते ७५०० रुपये प्रती क्विंटल, हिरवी मिरची २००० ते ४५०० रुपये प्रती क्विंटल, पोकळा - १००० ते २००० रुपये प्रती क्विंटल, गिलके २००० ते ५००० रुपये प्रती क्विंटल, चवळी शेंगा - ४५०० रुपये प्रती क्विंटल, शिमला मिरची - १५०० ते ३५०० रुपये प्रती क्विंटल.