जिल्हा रुग्णालयात जून महिन्यापासून सिटीस्कॅन सेवा
By admin | Published: May 27, 2017 04:16 PM2017-05-27T16:16:12+5:302017-05-27T16:16:12+5:30
रुग्णांना मिळणार दिलासा : जिल्हा रुग्णालय खोलीचे काम अंतिम टप्प्यात
Next
>ऑनलाईन लोकमत
जळगाव,दि.27- गेल्या अनेक दिवसांपासून सिटीस्कॅनची व्यवस्था नसलेल्या जिल्हा रुग्णालयाला मिळालेले सिटीस्कॅन मशिन जून महिन्यात कार्यान्वित होऊन ते रुग्णसेवेत येण्याचे सुखद चित्र आहे.
सिटीस्कॅनसाठी असलेल्या खोलीचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. आठवडाभरात सिटीस्कॅन मशिन तेथे बसविले जाईल. गेल्या कित्येक वर्षापासून जिल्हा रुग्णालयात सिटीस्कॅनची सोय नसल्याने सिटीस्कॅनसाठी रुग्णांना इतरत्र न्यावे लागत होते. अखेर जिल्हा रुग्णालयाला 3 कोटी 41 लाख रुपयांचे सिटीस्कॅन मशिन मिळाले आहे.
सिटीस्कॅन मशिन जिल्हा रुग्णालयात स्वतंत्र खोलीमध्ये बसविण्यात येणार असून त्यासाठी या खोलीचे काम हाती घेण्यात आले. या ठिकाणी विजेच्या जोडणीचे काम बाकी होते, तेदेखील आता अंतिम टप्प्यात आले. हे काम पूर्ण झाल्यानंतर सिटीस्कॅन मशिन त्या ठिकाणी बसविण्यात येऊन ते रुग्णसेवेत येण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.