महापालिकेत सर्रासपणे येताहेत नागरिक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2021 04:16 AM2021-04-08T04:16:04+5:302021-04-08T04:16:04+5:30
रिॲलिटी चेक शहरात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने जिल्हा प्रशासनाने ३० एप्रिलपर्यंत कडक निर्बंध लावले आहेत. यामध्ये शासकीय कार्यालयांमध्ये ...
रिॲलिटी चेक
शहरात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने जिल्हा प्रशासनाने ३० एप्रिलपर्यंत कडक निर्बंध लावले आहेत. यामध्ये शासकीय कार्यालयांमध्ये सर्वसामान्य नागरिकांना येण्यास मज्जाव करण्यात आला आहे. काही आवश्यक काम आपल्यासच शासकीय कार्यालयात यावे, अशा सूचना जिल्हा प्रशासनाने केल्या आहेत. काही महत्त्वाची कामे असल्यास ती ऑनलाईन पद्धतीने करण्यात यावीत, अशा सूचना जिल्हा प्रशासनाने दिल्या होत्या. मात्र, महापालिकेत जिल्हा प्रशासनाच्या सूचनांकडे सर्रासपणे दुर्लक्ष होताना दिसून येत आहे. लहानात लहान कामासाठीही नागरिक महापालिकेत येत असल्याचे चित्र पाहावयास मिळाले. नगररचना विभागातही अनेक नागरिक कामासाठी आले होते. यासह मनपा आरोग्य विभागातही काही नागरिक आपली तक्रार घेऊन आले होते. पदाधिकाऱ्यांसोबत अनेक नागरिक सर्रासपणे महापालिकेत येत असल्याचे पाहावयास मिळाले. महापालिकेच्या प्रवेशद्वारावर येणाऱ्या नागरिकांना सॅनिटायझर देण्यासह त्यांची मशीनद्वारे तापमान तपासणीही केली जात आहे. या व्यतिरिक्त कोणत्याही सूचना किंवा फलक याठिकाणी लावण्यात आलेला नाही.