घनकचरा प्रकल्पातून निघणाऱ्या धुरामुळे नागरिक बेहाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2021 04:16 AM2021-03-31T04:16:28+5:302021-03-31T04:16:28+5:30
गाळेधारक उपोषणाच्या तयारीत जळगाव - मनपा मालकीच्या मार्केटमधील मुदत संपलेले गाळेधारकांनी प्रशासनाविरोधात दोन दिवसांपासून बेमुदत संप पुकारला आहे. गाळेधारकांनी ...
गाळेधारक उपोषणाच्या तयारीत
जळगाव - मनपा मालकीच्या मार्केटमधील मुदत संपलेले गाळेधारकांनी प्रशासनाविरोधात दोन दिवसांपासून बेमुदत संप पुकारला आहे. गाळेधारकांनी आता बुधवारपासून महापालिकेच्या विरोधात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषणाची तयारी सुरू केली असून, याबाबत जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्याकडे त्यांनी परवानगी मागितली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. गाळेधारक महापालिका प्रशासनाविरोधात तीव्र आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत.
जेके पार्कची जागा अद्यापही ताब्यात नाही
जळगाव - शहरातील शिवाजी उद्यान परिसरातील जे के पार्कची मुदत संपत वर्ष उलटून गेले आहे. तरीही महापालिका प्रशासनाने ही जागा अद्यापही ताब्यात घेतली नाही. जे के डेव्हलपर्सला महापालिका प्रशासनाने तीन वेळा नोटीस देऊनही ही जागा महापालिकेच्या ताब्यात दिली नाही. महापालिका प्रशासन देखील या जागेबाबत दुर्लक्ष करत असल्याचे दिसत आहे.
नुकसान झालेल्या पिकांच्या पंचनाम्याची प्रतीक्षा
जळगाव -जिल्ह्यात गेल्या आठवड्यात अनेक भागांमध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावली होती. काही भागात गारपीट सह वादळी पावसामुळे रब्बीच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. कृषी विभागाने नुकसानीची आकडेवारी जाहीर केली असली तरी अजूनही नुकसान झालेल्या भागात पाहणी करून पंचनामे करण्यात आलेले नाही. यामुळे शेतकऱ्यांकडून तीव्र संताप व्यक्त केला जात असून, प्रशासनाने त्वरित पंचनामे करावेत व नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.
सातपुड्यात पुन्हा लागला वणवा
जळगाव - जिल्ह्यातील सातपुड्याच्या जंगलात गेल्या महिन्यात लागलेली आग वनविभागाने आटोक्यात आल्यानंतर, पुन्हा वैजापूर चोपडा तालुक्यातील चौगाव परिसरात वणवा पेटला आहे. वनविभागाकडे कमी असलेला स्टाफ व काही कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्यामुळे ही आग आटोक्यात आणताना वनविभागातील कर्मचाऱ्यांना चांगले प्रयत्न करावे लागत आहेत. हळूहळू ही आग इतर परिसरात देखील पसरू लागली आहे. यामुळे वन विभागातील कर्मचाऱ्यापुढे मोठे संकट उभे राहिले आहे.