तलाठी बांधवांच्या लेखणी बंदमुळे नागरिकांचे हाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2018 10:12 PM2018-01-29T22:12:33+5:302018-01-29T22:14:18+5:30

उतारे मिळत नसल्याने कामे खोळंबली

Citizens' closure due to the closure of talathi | तलाठी बांधवांच्या लेखणी बंदमुळे नागरिकांचे हाल

तलाठी बांधवांच्या लेखणी बंदमुळे नागरिकांचे हाल

Next
ठळक मुद्देदोन दिवसात राज्यभर बंदचा इशाराउतारे मिळेना

ऑनलाईन लोकमत

जळगाव, दि. 29 -  अमळनेर तालुक्यातील पिंगळवाडे येथील तलाठी योगेश रमेश पाटील यांना झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ जिल्ह्यातील सर्व तलाठी, मंडळाधिका:यांनी सुरू केलेल्या लेखणी बंद आंदोलनामुळे जिल्हाभरात कोणतेच उतारे मिळत नसल्याने नागरिकांचे हाल होत आहे. दरम्यान, दोषींना अटक न केल्यास राज्यभर लेखणी आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. 
अमळनेर तालुक्यातील पिंगळवाडे येथील तलाठी योगेश रमेश पाटील यांना 17 जानेवारी रोजी अमळनेर कृषी उत्पन्न बाजार समितीत मारहाण करण्यात आली होती. त्याच्या निषेधार्थ जिल्ह्यातील सर्व तलाठी, मंडळाधिका:यांनी 18 जानेवारीपासून  लेखणी बंद आंदोलन सुरू केले असून ते 12 दिवसानंतरही सुरूच आहे. आता या आंदोलनात नाशिक विभागातील तलाठीदेखील सहभागी झाले असून 24 जानेवारीपासून संपूर्ण विभागात लेखणी बंद सुरू आहे. 12 दिवस उलटूनही जिल्हा प्रशासन व शासनाने कोणतीही दखल न घेण्यात आलेली नाही.

कामकाज ठप्प
तलाठी बांधवांच्या लेखणी बंद आंदोलनामुळे जिल्हाभरात कामकाज ठप्प झाले आहे. महसूल विभागाचा महत्त्वाचा दुवा असलेल्या तलाठी बांधवांमार्फत काम होत नसल्याने नागरिकांचे कामे खोळंबून विभागाचा महसूलही बुडून नुकसान होत आहे. 
उतारे मिळेना
लेखणी बंदमुळे तलाठी कार्यालयेच बंद राहत आहे. दररोज अनेक जण या ठिकाणी कामानिमित्त येऊन माघारी परतत आहे. या आंदोलनामुळे नागरिकांना सातबारा उता:यासह विविध प्रकारचे नमुने, मालमत्तेवरील बोजांचे कामे, खरेदी-विक्रीचे व्यवहार रखडले आहे. या शिवाय शालेय विद्याथ्र्यासह नागरिकांना तहसील, जिल्हाधिकारी कार्यालयात अर्ज करण्यासाठी लागणारे दाखलेही मिळत नसल्याने नागरिकांचे हाल होत आहे. 
दोषींना अटक न केल्यास राज्यभरात लेखणी बंद आंदोलन
दोषींना अटक होत नसल्याने जिल्हा बंद नंतर विभागातही लेखणी बंद आंदोलन सुरू झाले आहे. या संदर्भात 29 जानेवारी रोजी जळगाव जिल्हा तलाठी संघाचे जिल्हाध्यक्ष एन.आर. ठाकूर, सरचिटणीस जी.डी. बंगाळे यांच्यासह  राज्य संघटनेचे अध्यक्ष ज्ञानदेव डूबल, सरचिटणीस लक्ष्मीकांत काजे व मारहाण झालेले तलाठी योगेश पाटील तसेच इतरांनी विभागीय आयुक्त महेश झगडे यांची भेट घेऊन दोषींना अटक करण्याची मागणी केली. या वेळी विभागीय आयुक्तांनी आंदोलन मागे घेण्याविषयी पदाधिका:यांना सांगितले. मात्र आंदोलनावर ठाम राहणार असून दोषींना अटक न झाल्यास दोन दिवसात राज्यभर लेखणी आंदोलन करण्यात येणार असल्याचे पदाधिका:यांनी  ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. 
तलाठी बांधव हे सरकारचेच काम करीत असतात. मात्र सध्या सत्ताधारी असलेल्या पक्षाच्या पदाधिका:यांकडूनच मारहाण होत असेल तर आम्ही कोणाकडे पहायचे, असा सवाल जिल्हाध्यक्ष एन.आर. ठाकूर यांनी केला आहे. या प्रकरणात केवळ चालक, मालकांना अटक केली आहे, मात्र पोलिसांकडे आम्ही दिलेल्या फिर्यादीमध्ये ज्यांची नावे आहे, त्या सर्वाना अटक करावी अशी मागणी असल्याचेही ठाकूर म्हणाले. पोलिसांकडूनही या प्रकरणात चालढकल केली जात असल्याचा आरोप त्यांनी केला. 
 
तलाठी मारहाण प्रकरणात दोषींना अटक होत नाही तोर्पयच लेखणी बंद सुरूच राहणार आहे. मारहाणीचे हे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असल्याने वेळीच ते रोखणे गरजेचे आहे. 
- डी.एस. भालेराव, संघटक, महाराष्ट्र राज्य तलाठी संघ. 

Web Title: Citizens' closure due to the closure of talathi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.