भुसावळात घरकुल प्रकरणी नागरिकांनी मांडल्या व्यथा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2019 07:39 PM2019-11-20T19:39:56+5:302019-11-20T19:42:24+5:30
पंतप्रधान आवास योजनेंतर्गत लाभार्र्थींना दोन वर्षांनंतरही घरकुल मिळाले नसल्याने लाभार्र्थींनी आपल्या व्यथा मांडल्या.
भुसावळ, जि.जळगाव : पंतप्रधान आवास योजनेंतर्गत लाभार्र्थींना दोन वर्षांनंतरही घरकुल मिळाले नसल्याने लाभार्र्थींनी आपल्या व्यथा मांडल्या. याआधी मुख्याधिकारी करुणा डहाळे बाहेर जात असताना त्यांचे वाहन अडवून त्यांना जाब विचारला. यावर मंजूर सर्व घरकुले दोषमुक्त करून लाभार्र्थींना दिली जातील, असे मुख्याधिकाऱ्यांनी आश्वासन दिले.
पंतप्रधान आवास योजनेंतर्गत घरकुल भागातील पात्र लाभार्र्थींना हक्काचे घरकुल उभारता यासाठी शासनाकडून अनुदान स्वरूपात आर्थिक मदत मिळते. सन २०१७-१८ मध्ये भुसावळ पालिकेकडून पात्र लाभार्र्थींकडून अर्ज भरण्यात आले होते. दोन वर्षांचा कालावधी उलटूनही लाभार्र्थींना घरकुल बांधकामासाठी कोणत्याही स्वरूपाची आर्थिक मदत मिळालेली नाही. अवकाळी पावसामुळे अनेक नागरिकांचे संसार उघड्यावर आले आहे. त्यांना त्वरित लाभ मिळावा याकरिता माजी नगरसेवक दीपक धांडे यांनी पुढाकार घेतला. याबाबत ७ नोव्हेंबर रोजी पात्र लाभार्र्थींना त्वरित लाभ मिळावा यासाठी निवेदन दिले होते.
लोकसभा निवडणुकीपूर्वी पालिका प्रशासनाने शहरातील जवळपास ३५० पेक्षा जास्त लाभार्र्थींची घरकुलांची यादी प्रसिद्ध केली होती व यासाठी एक कोटी ४४ लाख रुपयाचे अनुदान पहिल्या टप्प्यात पालिका प्रशासनाकडे प्राप्त झाले आहे. परंतु संथ गतीने सुरू असलेल्या कारभारामुळे लाभार्र्थींना योजनेपासून वंचित राहावे लागत आहे. लाभार्र्थींनी संबंधित अधिकाºयांकडे कागदपत्र पत्राची पूर्तता करूनसुद्धा व यासाठी पाच हजाराचा आर्थिक भुर्दंड सोसावा लागला आहे. उसने घेऊन कागदांची पूर्तता केलेली आहे. परंतु लाभ काही मिळालाच नाही. यातूनच नागरिकांच्या भावना तीव्र झाल्या. म्हणून नागरिकांनी आंदोलनाचा पवित्रा उगारला.
जास्तीत जास्त पात्र लाभार्र्थींना घरकुल मिळावे यासाठी प्रशासन युद्धपातळीवर प्रयत्न करीत आहे. परंतु अनेक प्रस्तावामध्ये गट नंबर, सर्वे नंबर लाभार्र्थींचे नाव यात गोंधळ आहे. यामुळे चुकीच्या व्यक्तीला त्याचा लाभ होऊ नये याकरिता काही विलंब झाला आहे. लवकरच त्रुटी दूर करून पात्र लाभार्र्थींना हक्काचे घरकुल देण्यात येणार आहे.
-करुणा डहाळे, मुख्याधिकारी, नगरपालिका, भुसावळ