विजेच्या लपंडावाने नागरिक हैराण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2017 11:44 AM2017-06-09T11:44:34+5:302017-06-09T11:44:34+5:30
जळगाव तालुक्यातील स्थिती : पाणी पुरवठा ठप्प व पिठाच्या गिरण्या बंद
Next
ऑनलाईन लोकमत
जळगाव,दि.9 - मृग नक्षत्राच्या प्रारंभीच जोरदार पावसाने हजेरी लावून जळगावकरांना दिलासा तर मिळाला, मात्र वीज गूल झाल्याने बुधवारी व गुरुवारी संध्याकाळ र्पयत विजेचा चांगलाच ‘झटका’ सहन करावा लागला.
बुधवारी रात्री अनेक भागात तीन-तीन तास वीज गायब असल्याने तर गुरुवारीही दिवसभर विजेचा लपंडाव सुरू असल्याने नागरिक चांगलेच घामाघूम झाले. आधीच पाणीपुरवठा विस्कळीत असताना काही भागात उशिरा पाणी आले, मात्र वीजच नसल्याने नागरिकांना पाण्यापासूनही वंचित रहावे लागले.
तीन दिवसांपूर्वी झालेल्या मान्सूनपूर्व पहिल्याच पावसाने वीज पुरवठा खंडित झाला होता. त्यानंतर दोन दिवसात कोठे काही मान्सूनपूर्व कामे बाकी आहे का? याची पाहणी न झाल्याने बुधवारी रात्री पुन्हा पाऊस सुरू होताच वीज गूल झाली. त्यात जोरदार पाऊस असल्याने बिघाड काढला गेला नाही व अनेक भागात तीन-तीन तास वीज पुरवठा खंडित राहिला.
खंडित विजेमुळे पाणी मिळेना
गेल्या पाच दिवसांपासून शहराचा पाणीपुरवठाही विस्कळीत झाला आहे. दररोज एक-एक दिवस पाणीपुरवठा पुढे ढकलला जात आहे. मात्र पुन्हा वीज गूल होऊन ठरलेल्या दिवशीही पाणीपुरवठा होऊ शकत नसल्याचे चित्र आहे. अशाच प्रकारे बुधवारी रात्री नंदनवनकॉलनी परिसरात कसेबसे नळांना पाणी आले, मात्र नेमके त्याचवेळी वीज खंडित झाल्याने रहिवाशांना पाणी मिळू शकल ेनाही.