शौचालय बांधण्यास नागरिक निरुत्साही
By admin | Published: January 19, 2016 12:58 AM2016-01-19T00:58:21+5:302016-01-19T00:58:21+5:30
वर्षभरात अवघ्या 161 नागरिकांनीच उभारणी केल्याची बाब समोर आली आह़े शौचालय बांधण्याबाबत एकूणच नागरिक निरूत्साही असल्याचे चित्र दिसत आह़े
भुसावळ : स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत शौचालय बांधण्यासाठी चार हजारांचे उद्दिष्ट देण्यात आले असलेतरी वर्षभरात अवघ्या 161 नागरिकांनीच उभारणी केल्याची बाब समोर आली आह़े शौचालय बांधण्याबाबत एकूणच नागरिक निरूत्साही असल्याचे चित्र दिसत आह़े स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत भुसावळ पालिकेला 2015-2016 वर्षासाठी चार हजार शौचालय बांधण्याचे उद्दिष्ट देण्यात आले होते. मात्र पालिकेला कायमस्वरूपी मुख्याधिकारी नसल्याने योजनेची अंमलबजावणी रखडली होती़ मुख्याधिकारी बी़टी़ बाविस्कर रूजू झाल्यानंतर काही अंशी का होईना उद्दिष्ट पूर्ततेसाठी सुरुवात झाली आह़े नागरिक निरुत्साही भुसावळ शहरासाठी तब्बल चार हजार शौचालयांचे उद्दिष्ट शासनाकडून देण्यात आले होते, मात्र प्रत्यक्षात जानेवारी 2016 र्पयत केवळ 161 नागरिकांनी शौचालयाची उभारणी केली आह़े 200 गरजूंना लवकरच लाभ पालिकेचे मुख्याधिकारी बी़टी़ बाविस्कर यांनी 26 जानेवारीर्पयत आणखी 200 गरजू नागरिकांना शौचालय बांधण्यासाठी अनुदान दिले जाईल, असे लोकमतशी बोलताना सांगितल़े नागरिकांनी अधिकाधिक संख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले आह़े