राजकीय पदाधिकाऱ्यांचा आवाहनाला नागरिकांनी दिला फाटा, जनता कर्फ्यूच्या आवाहनानंतरही रस्त्यांवर गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2020 01:37 PM2020-05-14T13:37:10+5:302020-05-14T13:38:05+5:30
जळगाव : शहरात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने शहरातील सर्वच प्रमुख राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी १४ ते १७ मे दरम्यान ...
जळगाव : शहरात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने शहरातील सर्वच प्रमुख राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी १४ ते १७ मे दरम्यान ‘जनता कर्फ्यू’ पाळण्याचे आवाहन केले होते. मात्र, गुरुवारी शहराची स्थिती पाहता शहरातील रस्त्यांवर नेहमीपेक्षा जास्त नागरिकांची वर्दळ सुरु असलेली पहायला मिळाली. त्यामुळे नागरिकांनी राजकीय पदाधिकाºयांचा आवाहनाला फाटा देत, कोरोनाबाबत नागरिक अजूनही गंभीर नसल्याचीच एकप्रकारे ग्वाही दिली. शहरातील मुख्य चौकांमध्ये भाजीपाला विक्रेत्यांकडे नागरिकांची गर्दी झाली होती. अनेक भागांमध्ये युवकांचे गप्पांचे फड रंगलेले दिसून आले. तसेच शहरातील अत्यावश्यक सुविधा वगळता सर्वच दुकाने बंद असतानाही अनेकजण विनाकारण शहरात मोटारसायकल फिरवताना दिसले. त्यामुळे एकीकडे शहरातील कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना दुसरीकडे नागरिक लॉकडाऊनचे गांभिर्याने पालन करत नसल्याने शहरात कोरोना रुग्णांची संख्या अजून वाढण्याची भिती व्यक्त केली जात आहे.