पारोळा येथे डेंग्यूसदृश आजाराने नागरिक त्रस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2019 09:30 PM2019-08-27T21:30:34+5:302019-08-27T21:30:39+5:30
पारोळा : येथील नवीन वसाहतीत डी.डी.नगर, बालाजीनगर, बोरी कॉलनी, वधार्माननगर या भागात अनेक बालकांना डेंग्यूच्या आजाराची लक्षणे दिसून येत ...
पारोळा : येथील नवीन वसाहतीत डी.डी.नगर, बालाजीनगर, बोरी कॉलनी, वधार्माननगर या भागात अनेक बालकांना डेंग्यूच्या आजाराची लक्षणे दिसून येत आहेत. त्यामुळे पालकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
गेल्या ८ दिवसांपासून ही स्थिती असूनही पालिका प्रशासन आणि तालुका आरोग्य विभागाचे याकडे दुर्लक्ष होत आहे. शहरात डासांच्या प्रमाणात वाढ झाली असल्याने प्रशासनाने व्यापक स्वरूपात धूळ फवारणी करावी, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करीत आहेत.
दोन दिवसांपासून आरोग्य विभागाचे अधिकारी-कर्मचारी यांनी ज्या भागात डेंग्यूची साथ सुरू आहे, त्या भागातील पाण्याचे नमुने घेतले. तसेच डेंग्यूची लागण झालेल्या बालकांच्या रक्ताचे नमुने घेऊन औरंगाबाद येथे तपासणीसाठी पाठविले आहेत.
नागरिकांची आर्थिक लूट
शहरात सर्वच बाल रुग्णालयांमध्ये गर्दी असून डेंग्यू तपासणीसाठी ८०० ते ८५० रुपये मोजावे लागतात. तसेच शहरातील काही लॅबचालक रक्त आदी तपासणीसाठी अवाजवी पैसे घेत असून नागरिकांची आर्थिक लूट केली जात आहे. आरोग्य विभागाने याची दखल घ्यावी, अशी मागणी नागरिक करीत आहेत.