पारोळ्यात वाढत्या चोरी सत्राने नागरिक धास्तावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2019 03:01 PM2019-04-28T15:01:06+5:302019-04-28T15:02:50+5:30

गेल्या महिन्याभरात अनेक भागात धाडसी घरफोड्या व दुकानांमध्ये सुरू असलेले चोरीच्या सत्रामुळे नागरिक चांगलेच धास्तावले आहेत.

Citizens were afraid of a growing theft session in the past | पारोळ्यात वाढत्या चोरी सत्राने नागरिक धास्तावले

पारोळ्यात वाढत्या चोरी सत्राने नागरिक धास्तावले

Next
ठळक मुद्देलग्न व बाहेरगावी जाणे नाहीचपोलीस ठाण्यात जावे तर ‘तपास चालू आहे’ असेच मिळते उत्तरचोरीचा तपास लागत नसल्याने पोलिसांच्या कामकाजावर नागरिकांनी उपस्थित केले प्रश्नचिन्हकाही हॉटेलमध्ये बनावट दारू विक्रीचा कहरगुप्तवार्ता शाखेवर माहीतगार कर्मचाऱ्यांची करावी लागणार नियुक्ती

रावसाहेब भोसले
पारोळा, जि.जळगाव : गेल्या महिन्याभरात अनेक भागात धाडसी घरफोड्या व दुकानांमध्ये सुरू असलेले चोरीच्या सत्रामुळे नागरिक चांगलेच धास्तावले आहेत. वाढत्या चोरीच्या सत्रामुळे सुट्यांच्या काळात बाहेरगावी फिरायला जाणे व लग्न सभारंभासही जाणे नागरिक टाळत असल्याचे चित्र आहे.
आझाद चौकातील राजेंद्र चौधरी यांच्याकडे पाच लाखांची धाडसी चोरी झाली होती. पण तीन दिवस उलटूनदेखील काहीही तपास लागला नाही. यामुळे चोरटे मनमोकळे बिनधास्तपणे फिरताय. ज्याच्याकडे चोरी झाली तो दररोज चोरीचा काही तपास लागला का, याची विचारपूस करण्यासाठी पोलीस ठाण्याच्या पायºया झिजवित आहेत. पण तपास सुरू आहे. या उत्तरापलीकडे काही ऐकायला मिळत नसल्याची राजेंद्र चौधरी यांची व्यथा आहे.
वाढत्या चोरी सत्रामुळे व चोरीचा तपास लागत नसल्याने पोलिसांच्या कामकाजावर नागरिकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. एका बाजूला कालिपिली टॅक्सी, अवैध दारू विक्री, पत्ते अड्डे यांच्याकडून न चुकता हप्ते वसुली नियमितपणे केली जात आहे. मग चोरीचा तपास तेवढाच तत्परतेने का केला जात नाही, असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
काही हॉटेलमध्ये बनावट दारू विक्रीचा कहर सुरू आहे. अशा हॉटेलची कधी वरिष्ठ पातळीवरून साधी चौकशी वा तपासणी होऊ नये याबाबतही शंका नागरिकांकडून घेतली जात आहे.
दरम्यान, शहरात बनावट दारूमुळे अनेकांचे आयुष्य उद्ध्वस्त होऊ पाहत आहे. बनावट दारू पिल्यामुळे अनेक जण मृत्यूशी झुंजत आहे. अशा बनावट दारूवर पायबंद घातला गेला पाहिजे, अशी अपेक्षा शहरवासीयांकडून व्यक्त केली जात आहे. यासाठी पोलीस निरीक्षक लीलाधर कानडे यांना कठोरपणे पावले उचलावी लागतील. तसेच पारोळा पोलीस ठाण्याचा असलेला आत्मा म्हणजे गुप्तवार्ता शाखेवर तत्पर आणि तालुक्याची संपूर्ण माहिती असणाºया पोलीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी लागणार आहे.

Web Title: Citizens were afraid of a growing theft session in the past

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.