बहुळा नदीला पहिलाच पूर आल्याने नागरिक सुखावले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 04:34 AM2021-09-02T04:34:21+5:302021-09-02T04:34:21+5:30
पिंपळगाव (हरे.), ता. पाचोरा : पिंपळगाव हरेश्वर परिसरात व मुर्डेश्वरच्या खोऱ्यात मुसळधार पाऊस झाल्याने बहुळा नदीला पूर आला. नदीचे ...
पिंपळगाव (हरे.), ता. पाचोरा : पिंपळगाव हरेश्वर परिसरात व मुर्डेश्वरच्या खोऱ्यात मुसळधार पाऊस झाल्याने बहुळा नदीला पूर आला. नदीचे उगमस्थान मुर्डेश्वरच्या खोऱ्यातून होत असल्याने व या बहुळा नदीला उंदरी व सुखी या दोन नद्या मिळत असल्याने पाण्याची पातळी कमी वेळेत जास्त वाढते. बहुळा नदीच्या पाण्याची पातळी वाढल्याने बालगोपाळांपासून तर वृद्धांपर्यंत सगळ्यांनी मोठ्या संख्येने पूर पाहण्यासाठी गर्दी केली होती.
बाजारपेठमध्ये असलेल्या जमिनीलगतच्या फरशीवरून पाणी वाहत असल्याने या वाहत्या पाण्याचा आनंद घेताना बालगोपाळ दिसत आहेत. तसेच शनी मंदिर चौकात असलेल्या मोठ्या पुलावरदेखील खूप मोठ्या प्रमाणात पूर पाहण्यासाठी गर्दी झाली होती. मागील वर्षी व या वर्षी पावसाचे पाणी चांगले वाहिल्याने काही भागांमध्ये विहिरीच्या पाण्याच्या पातळीत वाढ होताना दिसून येत आहे. दरम्यान, पावसाचे प्रमाण जास्त असल्याने कपाशी, मूग, उडीद, मोसंबी या पिकांचे व फळ पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसानही होताना दिसून येत आहे.
010921\01jal_2_01092021_12.jpg
बहुळा नदीला पहिलाच पूर आल्याने नागरिक सुखावले