शहराचा पारा ३६ अंशावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2021 04:22 AM2021-02-26T04:22:35+5:302021-02-26T04:22:35+5:30
जळगाव - शहराच्या तापमानात आता दिवसेंदिवस वाढ होत असून, गुरुवारी शहराचा पारा ३६ अंशावर पोहाेचला होता. यामुळे दिवसा उन्हाळ्याची ...
जळगाव - शहराच्या तापमानात आता दिवसेंदिवस वाढ होत असून, गुरुवारी शहराचा पारा ३६ अंशावर पोहाेचला होता. यामुळे दिवसा उन्हाळ्याची चाहूल लागली असून, रात्रीच्या तापमानात देखील आता वाढ होऊ लागली आहे. मार्च महिन्याचा पहिल्या आठवड्यात पारा आणखीनच वाढण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. तसेच मार्च महिन्याच्या मध्यात पुन्हा अवकाळीचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.
मनपाचा लोकशाही दिन होणार ऑफलाईन
जळगाव - महापालिकेच्या लोकशाही दिनाचे आयोजन सोमवारी सकाळी १० वाजता मनपाच्या सभागृहात करण्यात आले आहे. मनपाचा लोकशाही दिन ऑफलाईन होणार असून, नागरिकांनी आपल्या तक्रारी सादर करण्यासाठी महापालिकेत येताना, मास्क वापरणे बंधनकारक असून, आपल्या अर्जासह सादर राहण्याचा सूचना मनपा प्रशासनाने दिल्या आहेत.
बाजार समितीत गर्दीवर नियंत्रण नाही
जळगाव - शहरात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असतानाही बाजार समितीमधील भाजीपाला मार्केटमध्ये होणाऱ्या गर्दीवर कोणतेही नियंत्रण आणण्यास बाजार समिती प्रशासनाला अपयश आले आहे. विशेष म्हणजे या गर्दीत प्रशासनाने आखून दिलेल्या नियमांचे कोणतेही पालन होताना दिसून येत नसून, प्रशासनाने आता कारवाई करण्याची गरज आहे.