पाचोरा शहर सौर दिव्यांच्या प्रकाशाने उजळणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2021 04:12 AM2021-06-06T04:12:53+5:302021-06-06T04:12:53+5:30

पाचोरा : महाराष्ट्र शासनाअंतर्गत नगर परिषदांना देण्यात येणाऱ्या वैशिष्ट्यपूर्ण कामासाठी विशेष अनुदान योजनेच्या अनुदानातून पाचोरा नगर परिषदेस ...

The city of Pachora will be illuminated by solar lights | पाचोरा शहर सौर दिव्यांच्या प्रकाशाने उजळणार

पाचोरा शहर सौर दिव्यांच्या प्रकाशाने उजळणार

Next

पाचोरा : महाराष्ट्र शासनाअंतर्गत नगर परिषदांना देण्यात येणाऱ्या वैशिष्ट्यपूर्ण कामासाठी विशेष अनुदान योजनेच्या अनुदानातून पाचोरा नगर परिषदेस शहरातील विविध भागांत सौर दिवे लावण्यासाठी तीन कोटी रुपयांच्या निधीस मंजुरी मिळाली असून यामुळे शहर सौर दिव्यांनी उजळून निघणार आहे. यामुळे पालिकेच्या वीज बिलात देखील बचत होणार असून रात्री-अपरात्री अचानक जाणाऱ्या विजेमुळे शहरात अंधार न होता सौर दिव्यांमुळे लखलखाट कायम राहणार आहे.

या कामासाठी १०० टक्के हिस्सा राहणार असून त्वरित कामांना सुरुवात करण्यात येणार आहे. हे काम शहरातील तलाठी कॉलनी, व्हीआयपी कॉलनी, जुना अंतुली रोडचा कॉलनी भाग, एमआयडीसी कॉलनी, गाडगेबाबानगर, भास्करनगर, विकास कॉलनी, संघवी कॉलनी, बाजोरियानगर, स्टेट बँक कॉलनी, मानसिंगका कॉलनी, जय किसान कॉलनी, जयराम कॉलनी, प्राध्यापक कॉलनी, दत्त कॉलनी, आनंदनगर, चिंतामणी कॉलनी, जिजामाता कॉलनी, भवरलालनगर, आशीर्वाद रेसिडेन्सी, आशीर्वाद कॉटेज, ड्रीम सिटी, गणेश कॉलनी, थेपडेनगर, विवेकानंदनगर, बळीराम पाटीलनगर, मिलिंदनगर, हनुमानवाडी, पंपिंग रोडलगतचा कॉलनी भाग, डाक बंगल्याजवळचा कॉलनी भाग, देशमुखवाडी, संभाजीनगर, बाहेरपुरा, आठवडी बाजार, मच्छी बाजार माहिजी रोड भाग, श्रीराम चौक रंगार गल्ली, गांधी चौक सोनार गल्ली, कोंडवाडा गल्ली, मुल्लावाडा, बोहरी गल्ली, मुस्लीम वस्ती, दलित वस्ती, कृष्णापुरी, त्रंबकनगर, श्रीरामनगर, सिंधी कॉलनी, जामनेर रोड, शिवाजीनगर, जनता वसाहत, नागसेननगर, शिवाजी चौक व शहरातील इतर छोटे -मोठे कॉलनी भागात स्ट्रीट लाइट पोल बसविले जाणार आहेत. निधीच्या मंजुरीसाठी आ. किशोर पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे आभार मानले आहेत. नगरपालिकेच्या माध्यमातून जास्तीत जास्त चांगल्या सेवा नागरिकांना प्रदान केल्या जात असल्याबद्दल त्यांनी पालिकेच्या कामाचे कौतुक केले आहे. दरम्यान नगराध्यक्ष संजय गोहिल यांनी संपूर्ण शहरवासीयांच्या वतीने आ. किशोर पाटील यांचे आभार मानले आहेत.

पाचोरा व भडगाव शहरांच्या सर्वांगीण विकासासाठी शासन स्तरावरून भरघोस निधी कायम मिळवला असून उर्वरित कामांसाठीही निधीची कमतरता भासू देणार नाही.

-किशोर पाटील,

आमदार, पाचोरा-भडगाव

Web Title: The city of Pachora will be illuminated by solar lights

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.