शहराची हगणदरीमुक्तीकडे वाटचाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2017 11:32 PM2017-01-30T23:32:32+5:302017-01-30T23:32:32+5:30
भुसावळ : रावेर शहर हगणदरीमुक्त झाले असून भुसावळ व यावल शहराची हगणदरीमुक्तीकडे वाटचाल सुरू आहे.
भुसावळ : रावेर शहर हगणदरीमुक्त झाले असून भुसावळ व यावल शहराची हगणदरीमुक्तीकडे वाटचाल सुरू आहे. मार्चअखेर्पयत काम पूर्ण होईल, असा आशावाद स्वच्छ महाराष्ट्र नागरी अभियानचे संचालक उदय टेकाळे (मुंबई) यांनी तिनही शहरांच्या भेटीप्रसंगी व्यक्त केला़
रावेर येथे मॉडेल शौचालयांची तर भुसावळात हगणदरीमुक्त 12 जागांची पाहणी करण्यात आली़ यावलला बैठक झाली़
4भुसावळ
समितीने शहरातील 18 पैकी 12 हगणदरीमुक्त जागांची पाहणी केली़ नगरपालिकेच्या विविध विभागांचे कर्मचारी उपस्थित होत़े सोमवारी सकाळी साडेदहा वाजता त्यांनी सर्व पदाधिका:यांसोबत संवाद साधला़ प्रसंगी स्वच्छ महाराष्ट्र अभियानचे विशेष कार्यकारी अधिकरी विजय सनेर, जिल्हा परिषद नगरपालिका शाखेचे अनिकेत मानोरकर, नगराध्यक्ष रमण भोळे, उपनगराध्यक्ष युवराज लोणारी, मुख्याधिकारी बी़टी़ बाविस्कर यांच्यासह नगरसेवक व नागरिक उपस्थित होत़े
4रावेर
शहर हगणदरीमुक्त झाले आहे. एक कोटी रुपयांचे पारितोषिक पटकावण्यास पालिका सिद्ध झाली आह़े प्रत्येक घरात वैयक्तिक शौचालय झाल्यास तो आदर्श निर्माण होणार आह़े हरित महाकंपोस्ट खताच्या निर्मितीकडे प्राधान्याने लक्ष दिल्यास स्वच्छतेवर खर्च करण्याऐवजी उत्पन्नाचे साधन उपलब्ध होईल, असा आशावाद स्वच्छ अभियानचे संचालक उदय टेकाळे यांनी येथे व्यक्त केला़ शहरातील मॉडेल शौचालयांची शिवाय हगणदरीमुक्त परिसराची पाहणी त्यांनी केली़ पालिका सभागृहात त्यांनी मार्गदर्शन केल़े प्रसंगी विजय सनेर, अनिकेत मानोरकर, मुख्याधिकारी राहुल पाटील, आरोग्य निरीक्षक धोंडू वाणी, अभियंता प्रदीप पाटील यांच्या पथकाने शहरातील रसलपूर रोड, आठवडे बाजार परिसरातील मॉडेल शौचालयासह हगणदरीमुक्त झालेल्या परिसराची पाहणी केली़
नगरपालिका सभागृहात नगराध्यक्ष दारा मोहम्मद व उपनगराध्यक्ष सुधीर पाटील यांनी पथकाचे स्वागत केल़े मुख्याधिका:यांनी राबवलेल्या उपक्रमांची माहिती दिली़
विजय सनेर म्हणाले की, सार्वजनिक शौचालयांसोबत वैयक्तिक शौचालयांचे उद्दिष्ट पूर्ण करून साडेतीन कोटी रुपयांचा घनकचरा प्रकल्प यशस्वीरित्या राबवल्यास पुढची पिढी आपल्याला बहुमान दिल्याशिवाय राहणार नाही, असे सांगितल़े नगरसेविका शारदा चौधरी, संगीता महाजन, संगीता वाणी, संगीता अग्रवाल, रंजना गजरे, असदुल्ला खान, प्रकाश अग्रवाल, राजेंद्र महाजन, जगदीश घेटे, गणपत शिंदे, कलीम शेख, सूर्यकांत अग्रवाल, भास्कर महाजन, नगरपालिका कर्मचारी उपस्थित होत़े नगरसेवक सूरज चौधरी यांनी आभार मानल़े
4यावल
हगणदरीमुक्त शहर योजनेचा आढावा घेण्यासाठी तीन सदस्यीय समितीने भेट दिली़ पालिका प्रशासनाच्या वतीने मार्चर्पयत शहर हगणदरीमुक्तीचे समितीला आश्वासन देण्यात आल़े प्रसंगी नगराध्यक्षा सुरेखा कोळी, नगरसेवक, मुख्याधिकारी सोमनाथ आढाव, अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.
महिलांसाठी आधी शौचालय बांधा मगच त्यांचा गुलाबपुष्प देऊन सत्कार करा, अशी मागणीवजा निवेदन जनआधार विकास पार्टीतर्फे पालिकेच्या मुख्याधिका:यांना देण्यात आल़े गुलाबपुष्प देऊन महिलांचा सत्कार करणे हा एकप्रकारे अपमानच आह़े शासनाच्या माध्यमातून राबवण्यात येणारी शौचालय बांधकामासाठीच्या योजनेत सत्ताधारी भेदभाव करीत आह़े लाभार्थी व गरजूंना यापासून वंचित ठेवले जात आह़े अनुदान वाटपात भ्रष्टाचार व वशिलेबाजी होत असल्याचा आरोपही करण्यात आला आह़े धम्मनगरातील महिलांना तातडीने शौचालय बांधून द्यावे, अशी मागणी करण्यात आली़ निवेदनावर गटनेता उल्हास पगारे, पुष्पा जगन सोनवणे, नूरजहाँ आशिक खान, रवींद्र सपकाळे, साधना भालेराव, राहुल बोरसे, नीलिमा पाटील, नितीन धांडे, सलीम नादर पिंजारी़ श़ेशब्बीर जाहीरा बी़आदींची निवेदनावर नावे आहेत़