दुरुस्तीच्या कामामुळे आज शहरात होणार नाही पाणीपुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2021 04:13 AM2021-05-29T04:13:49+5:302021-05-29T04:13:49+5:30

जळगाव : शहरात पाणीपुरवठा करणाऱ्या वाघुर पंपिंग स्टेशन वर अमृत पाणी पुरवठा योजनेअंतर्गत ५०० अश्वशक्तीचे नवीन पंप मोटार सह ...

The city will not have water supply today due to repair work | दुरुस्तीच्या कामामुळे आज शहरात होणार नाही पाणीपुरवठा

दुरुस्तीच्या कामामुळे आज शहरात होणार नाही पाणीपुरवठा

Next

जळगाव : शहरात पाणीपुरवठा करणाऱ्या वाघुर पंपिंग स्टेशन वर अमृत पाणी पुरवठा योजनेअंतर्गत ५०० अश्वशक्तीचे नवीन पंप मोटार सह बसवण्यात येत असल्याने व सब स्टेशन वरील विद्युत देखभालीची कामे, एअर व्हाॅल्व दुरुस्तीचे काम मनपा पाणीपुरवठा विभागाकडून घेण्यात आल्यामुळे शनिवारी शहरात होणारा पाणीपुरवठा एक दिवस पुढे ढकलण्यात आला आहे. त्यामुळे शनिवारी शहरात पाणीपुरवठा होणार नसल्याची माहिती पाणीपुरवठा विभागाकडून देण्यात आली आहे.

शुक्रवारी देखील काही ठिकाणी मनपा पाणीपुरवठा विभागाकडून व्हाॅल्व दुरुस्तीचे काम सुरू असल्यामुळे, काही भागात उशिराने पाणीपुरवठा झाला होता. त्यातच अमृत योजनेअंतर्गत वाघुर पंपिंग स्टेशन येथे नवीन पंप बसवण्याचे काम देखील बाकी असल्याने पाणी पुरवठा विभागाने सर्वच कामे शनिवारी हाती घेतली आहेत. यामुळे २९ रोजी होणारा पाणीपुरवठा ३० रोजी होईल. तर ३० रोजी होणारा पाणीपुरवठा ३१ रोजी होणार असल्याची माहिती मनपा पाणीपुरवठा विभागाचे मुख्य अभियंता कडून सांगण्यात आले आहे. तसेच नागरिकांनी पाण्याचा वापर काटकसरीने करावा असे आवाहन देखील मनपा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

रविवारी या भागात होईल पाणीपुरवठा

खंडेराव नगर, पिंप्राळा हुडको, सेंट्रल बँक कॉलनी, आशा बाबा नगर, शिंदे नगर, वाटिका आश्रम परिसर, निवृत्ती नगर, खोटे नगर, दादावाडी , अहुजा नगर , नित्यानंद नगर, संभाजीनगर, रायसोनी नगर, समता नगर, तांबापुरा, रामदास कॉलनी, महाबळ परिसर, तिवारी कॉलनी, कोल्हे नगर, बाहेती शाळा, सद्गुरु नगर, दत्तनगर व इक्बाल कॉलनी परिसर.

Web Title: The city will not have water supply today due to repair work

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.