शहरात उष्णतेचा कहर...
By admin | Published: March 30, 2017 12:01 AM2017-03-30T00:01:07+5:302017-03-30T00:01:07+5:30
शहराचा पारा ४२ अंशावर : सात वर्षातील सर्वाधिक तापमान
जळगाव : गेल्या आठवड्याभरापासून जळगाव शहरात उष्णतेची लाट पसरली असून, मार्च महिन्यात पारा ४२.८ अंशावर पोहचला असल्याने तापमानाने गेल्या सात वर्षाचा विक्रम मोडला आहे. जळगाव शहराचे तापमानाने मार्च महिन्यातच चाळीशी पार केल्याने जळगावकरांना असह्य उकाड्याचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे जळगाव शहरात दिवसभर अघोषित संचारबंदी असल्याचा भास जाणवत आहे. महाराष्टÑात सध्या कोरड्या व उष्ण वाºयांचा म्हणजेच ‘लू’ वाºयांचा प्र्रकोप वाढला असल्याने उष्णतेची लाट कायम राहणार आहे.
जळगाव शहराच्या तापमानाने ४२ अंशाचा पारा गाठला आहे. मार्र्च महिन्यात जळगाव पाºयाने ७ वर्षानंतर पहिल्यांदाच ४० अंशाचा पारा ओलांडला आहे. याआधी २०१० मध्ये जळगावचा पारा ४१ अंशावर पोहचला होता. त्यानंतर पहिल्यांदाच शहराच्या तापमानाने मार्च महिन्यात ४२.८ अंशाचा पारा गाठला आहे. तापमान वाढीमुळे सुवर्णनगरी म्हणून ओळखल्या जाणारे जळगाव शहर ‘हॉटसीटी’ म्हणून ओळखले जात आहे. तापमान वाढीमुळे जनजीवनावर मोठा परिणाम झाल्याचे दिसून येत आहे. सकाळी ११ वाजेनंतर शहरातील मुख्य रस्त्यांप्रमाणे उपनगरातील रस्तेदेखील ओस पडलेले पहायला मिळत आहे. तसेच रात्री उशिरापर्यंत उष्णतेचा झळा नागरिकांना बसत आहेत. त्यामुळे रुग्णांच्या संख्येतदेखील वाढ होत आहे.
आठवडाभर राहणार कहर कायम
उत्तर भारत व राजस्थान कडून येत असलेल्या उष्ण वाºयांमुळे तापमानात वाढ होत असल्याची माहिती पुणे हवामान खात्याकडून देण्यात आली आली आहे. ‘लू’ वाºयाचा जोर कायम राहण्याचा अंदाज असल्याने अजून आठवडाभर तरी जळगावकरांना उकाड्यापासून दिलासा मिळण्याची शक्यता नाही. शहराचा पारा ४२ अंशावर गेला आहे. यामुळे नागरिकांसोबतच पशुपक्ष्यांचेदेखील हाल होत आहे. अशा परिस्थितीत महावितरणकडून भारनियमन सुरू करण्यात आले आहे. उकाड्यापासून त्रस्त असलेल्या नागरिकांच्या त्रासात वाढ होत आहे. दुपारी ३ तास भारनियमन होत असल्याने जबरदस्त उकाड्यामुळे घरात राहणेदेखील शक्य होत नाही.
जिल्हा सामान्य रुग्णालयात उष्माघात कक्ष सुरू
उन्हाचा प्रकोप वाढल्याने जिल्हा सामान्य रुग्णालयात उष्माघात कक्ष सुरू करण्यात आला आहे. तसेच येत्या आठवड्यात १३ क्रमांक वार्ड मध्येदेखील उष्माघात कक्ष सुरू केला जाणार असल्याची माहिती डॉ.दत्तात्रय बिराजदार यांनी दिली. दरवर्षी एप्रिल महिन्याचा पहिल्या आठवड्यात उष्माघात कक्ष सुरू केला जातो. मात्र यंदा मार्च महिन्यातच उष्माघात कक्ष सुरूझाला.