नशिराबाद येथे दोन गटात हाणामारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2018 08:26 PM2018-05-22T20:26:17+5:302018-05-22T20:26:17+5:30
मोकळ्या जागेत विहीर खोदण्याच्या कारणावरून दोन गटात वाद उफाळून हाणामारी झाली. त्यात दोन जणांना गंभीर दुखापत आहे. दोन्ही गटाने परस्पर विरोधी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी १६ जणांवर दंगलीचा गुन्हा दाखल केला आहे.
आॅनलाईन लोकमत
नशिराबाद, जि.जळगाव, दि.२२ : मोकळ्या जागेत विहीर खोदण्याच्या कारणावरून दोन गटात वाद उफाळून हाणामारी झाली. त्यात दोन जणांना गंभीर दुखापत आहे. दोन्ही गटाने परस्पर विरोधी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी १६ जणांवर दंगलीचा गुन्हा दाखल केला आहे. त्यात १५ जण अटकेत आहे. ही घटना नशिराबाद येथे सोमवारी रात्री साडेआठ वाजता रहेमतपुरा भागात घडली.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक आर.टी.धारबळे, पोलीस उपनिरीक्षक अशोक खरात, गुलाब माळी, चेतन पाटील, शांताराम तळेले, युनूस शेख, राजेंद्र साळुंखे आदी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. वेळीच पोलिसांनी हस्तक्षेप केल्याने पुढील अनर्थ टळला. दोन्ही गटाच्या जमावाने पोलिसात गर्दी केली होती.
परस्पर विरोधी गुन्हा दाखल होताच पोलिसांनी मध्यरात्रीच तर काहींना पहाटे शोधून काढत अटक केली. १६ पैकी १५ जणांना अटक पोलिसांनी केली असल्याचे सूत्रांनी सांगितले.