जळगाव शहरात दहावीच्या विद्यार्थ्याने घेतला गळफास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2018 09:06 PM2018-06-21T21:06:20+5:302018-06-21T21:06:20+5:30
शाळेतून घरी पोहचताच वैभव अशोक पाटील (वय १५, मुळ रा.अंजनविहिरे,ता.धरणगाव)या दहावीच्या विद्यार्थ्याने वरच्या मजल्यावर जाऊन ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी दुपारी अडीच वाजता पिंप्राळ्यातील इंद्रनील सोसायटीत उघडकीस आली. वैभव याने आत्महत्या का? केली याबाबत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे.
आॅनलाईन लोकमत
जळगाव दि,२१ : शाळेतून घरी पोहचताच वैभव अशोक पाटील (वय १५, मुळ रा.अंजनविहिरे,ता.धरणगाव)या दहावीच्या विद्यार्थ्याने वरच्या मजल्यावर जाऊन ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी दुपारी अडीच वाजता पिंप्राळ्यातील इंद्रनील सोसायटीत उघडकीस आली. वैभव याने आत्महत्या का? केली याबाबत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. दरम्यान, याप्रकरणी रामानंद नगर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, वैभव हा ख्वाजामिया चौक परिसरातील प्रगती माध्यमिक विद्यालयात दहावीच्या वर्गात होता. गुरुवारी दुपारी तो शाळेतून घरी आला. पायातील बुट व पायमोजे काढून तो शाळेच्यागणवेशातचथेट वरच्या मजल्यावर गेला. आई चित्रा व वडील अशोक डोंगर पाटील हे दवाखान्यात दाखल असलेल्या नातेवाईकांना पाहण्यासाठी गेले होते. आजोबा डोंगर पाटील हे घरीच होते. लहान भाऊ मयुर हा सातवीला असून तो देखील शाळेतून घरी आलेला होता.
लहान भाऊ मयुर हा त्याला बोलावण्यासाठी वरच्या मजल्यावर गेला असता वैभव याने गळफास घेतलेला दिसून आला. घाबरलेला मयुर तातडीने खाली आला व आजोबांना ही घटना सांगितली. गल्लीतील लोकांनी तत्काळ वैभवचा गळफास काढला व त्याला जिल्हा रुग्णालयात हलविले. तेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषीत केले. वैद्यकिय अधिकारी डॉ.प्रवीण पाटील यांनी वैभव याचे शवविच्छेदन केले.
शाळेत वाद झाल्याचा संशय
वैभव याने आत्महत्या का केली असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. घरातील वातावरण अतिशय चांगले होते. शाळेत नियमित जात असताना अचानक असे काय घडले की त्याला आत्महत्या करावी लागली. शाळेतून आल्यानंतर कोणालाच काहीच न सांगता थेट त्याने गळफास घेतला. शाळेत त्याचा कोणाशी तरी वाद झाला असावा असा संशय त्याच्या कुटुंबियांना आहे.