अ वर्ग पालिकेची एकाच बंबावर मदार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2017 12:21 AM2017-04-05T00:21:08+5:302017-04-05T00:21:08+5:30
पालिकेची बेफिकिरी : दुसरा बंब दुरुस्तीसाठी पुण्यात, ट्रॅक्टरसह टॅँकरचाही अभाव
भुसावळ : नाशिक विभागात एकमेव अ वर्ग असलेल्या भुसावळ पालिकेकडे आजमितीला अवघा एकच अगिAशमन बंब कार्यरत आह़े शहरात असलेली मर्मस्थळे व उन्हाळ्याचे दिवस पाहता लागणा:या आगीच्या घटना तातडीने आटोक्यात आणण्यासाठी पर्यायी बंब असणे अत्यंत आवश्यक आह़े
दरम्यान, पालिकेकडे दुसरा बंब असलातरी त्याच्या पंपातही बिघाड झाल्याने महिना-दोन महिन्यांपासून हा बंब पुण्यात दुरुस्तीसाठी पाठवण्यात आला आहे, मात्र तो दुरुस्त होणार कधी? याबाबत अनिश्चितता आह़े
बंबच काय टँकरही नाही
शहराला तापीचे नदीचे वरदान असलेतरी उन्हाळ्यात शहराच्या विस्तारीत भागात पाणीटंचाईची समस्या निर्माण होत़े अशा पाश्र्वभूमीवर त्या-त्या भागात टँकरने पाणीपुरवठा करणे पालिकेची जबाबदारी आहे, मात्र आजमितीला पालिकेकडे ट्रॅक्टर तर सोडाच साधा टँकरही नाही त्यामुळे नागरिकांना नाईलाजाने हजार ते दोन हजार रुपये देऊन खासगी टँकर आणून तहान भागवावी लागत़े मध्यंतरी विस्तारीत भागातील महिलांनी उपनगराध्यक्षांच्या दालनात ठिय्या मांडून तीव्र संताप व्यक्त केला होता़
टँकर निघाले भंगारात
पालिकेकडे काही काळापूर्वी अधिक प्रमाणावर टँकर होते, मात्र त्यांची झीज होऊन पत्रा सडल्याने मोठय़ा प्रमाणावर त्यांना गळती लागल्याने हे टँकर वापरायोग्य न राहिल्याने त्यांना पालिकेच्या जलशुद्धीकरण विभागात अडगळीत टाकण्यात आले आहेत़
उन्हाळ्याच्या पाश्र्वभूमीवर पालिकेने तातडीने नव्याने टँकर खरेदी केल्यास नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आह़े
महिना-दोन महिन्यांपासून पुण्यात दुरुस्तीसाठी पाठवण्यात आलेल्या पालिकेच्या अग्निशमन विभागातील बंब दुरुस्तीचे साधे इस्टिमेटही पालिकेला अद्याप मिळालेली नाही त्यामुळे नेमके इस्टिमेट कधी येऊन ते मंजूर होणार? बंबाची दुरुस्ती कधी होऊन तो शहरात परत येणार? हा सर्व प्रकार चमत्कारिक आह़े विशिष्ट मर्यादेर्पयत वाहन दुरुस्तीवर खर्च पालिकेला करता येतो तर दुसरीकडे उन्हाळ्याला सुरुवात झाल्यानंतर एकाच बंबावर शहराची मदार आह़े
4दुरुस्तीसाठी पुण्यात पाठवण्यात आलेला बंबाचा फायर पंप नादुरुस्त झाला आहे. तो जिल्ह्यात दुरुस्त होत नाही म्हणून त्यास पुण्यात पाठवण्यात आल्याचे मुख्याधिकारी बी़टी़बाविस्कर यांनी सांगितल़े लवकरच बंबाची दुरुस्ती होऊन तो परतणार असल्याचेही ते म्हणाल़े
4टंचाईग्रस्त भागात पाणीपुरवठा करण्यासाठी पालिकेकडे ना टँकर आहे ना पर्यायी बंब. त्यामुळे वेळीच दखल घ्यावी, अशी अपेक्षा नागरिकांमधून व्यक्त होत आह़े
1 सुमारे दोन लाखावर लोकसंख्या असलेल्या शहरात ऑर्डनन्स फॅक्टरी, लष्करी डेपो, दीपनगर प्रकल्प, जंक्शन रेल्वे स्थानक आदी मर्मस्थळे आहेत तर उन्हाळ्यात विविध कारणान्वये लागणा:या आगींचे प्रमाण पाहता एक बंब पुरेसा नाही़ शहरातील यापूर्वीच्या घटना पाहता एकच बंब आग विझविण्यासाठी धडपड करताना दिसून येतो व पाणी संपल्यानंतर पाणी बंब भरून आणण्यार्पयत इकडे पुन्हा आग भडकून मोठय़ा प्रमाणावर नुकसान होत़े गेल्या अनेक महिन्यांपासून अगिAशमन विभागाचा बंब खराब झाला असतानाही पालिका प्रशासनाने कुठलीही दखल घेतली नसल्याने आश्चर्य व संताप व्यक्त होत आह़े
पालिका करणार सहा ट्रॅक्टरची खरेदी
शहराची गरज लक्षात घेता पालिकेकडून लवकरच सहा ट्रॅक्टरची खरेदी केली जाणार असल्याचे मुख्याधिकारी बी़टी़ बाविस्कर म्हणाले. मात्र ट्रॅक्टरप्रमाणे पाणीपुरवठा करणारे टँकरही खरेदी केल्यास विविध कार्यक्रमांसह टंचाई काळात नागरिकांना दिलासा मिळणार आह़े