जुलै महिन्यात नववी, दहावी, बारावीचे वर्ग सुरू करावेत -मुख्याध्यापक संघ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2020 02:50 PM2020-07-02T14:50:00+5:302020-07-02T14:51:16+5:30

शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या १५ जूनच्या परिपत्रकानुसार १ जुलैपासून नववी, दहावी व बारावीचे वर्ग सुरू करावेत, असे म्हटले आहे. परंतु प्रत्यक्ष तसे आदेश प्राप्त न झाल्याने मुख्याध्यापक संघातर्फे हे वर्ग चालू करण्याच्या मागणीचे निवेदन गटशिक्षणाधिकारी यांना दिले आहे.

Classes of 9th, 10th and 12th should start in the month of July - Headmasters Association | जुलै महिन्यात नववी, दहावी, बारावीचे वर्ग सुरू करावेत -मुख्याध्यापक संघ

जुलै महिन्यात नववी, दहावी, बारावीचे वर्ग सुरू करावेत -मुख्याध्यापक संघ

googlenewsNext

मुक्ताईनगर, जि.जळगाव : शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या १५ जूनच्या परिपत्रकानुसार १ जुलैपासून नववी, दहावी व बारावीचे वर्ग सुरू करावेत, असे म्हटले आहे. परंतु प्रत्यक्ष तसे आदेश प्राप्त न झाल्याने मुख्याध्यापक संघातर्फे हे वर्ग चालू करण्याच्या मागणीचे निवेदन गटशिक्षणाधिकारी यांना दिले आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वच क्षेत्र बाधित झाले असूनल शिक्षण क्षेत्रही त्यातून सुटलेले नाही. दरवर्षी शैक्षणिक वर्ष १५ जूनपासून सुरू होते. परंतु यावर्षी कोरोनामुळे जुलैपासून सुरू होणार होते. त्यासंदर्भात शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या परिपत्रकानुसार इयत्ता नववी, दहावी व बारावीचे वर्ग १ जुलैपासून सुरू होणार होते. परंतु त्यासंदर्भात अद्यापही माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना आदेश प्राप्त झालेले नाहीत. त्यामुळे मुक्ताईनगर तालुका मुख्याध्यापक संघाचे तालुका अध्यक्ष एन.आय.पाटील, आर.पी.पाटील, पी. पी. दाणे, आर.एस.पाटील, एन. डी. काटे तसेच ए.के.सूर्यवंशी यांच्यातर्फे गटशिक्षणाधिकारी विश्वनाथ धनके यांना निवेदन देण्यात आले.


 

Web Title: Classes of 9th, 10th and 12th should start in the month of July - Headmasters Association

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.