रेल्वे प्रशासनातर्फे स्वच्छ रेल पंधरवडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2020 15:16 IST2020-09-21T15:13:51+5:302020-09-21T15:16:19+5:30
स्वच्छता पंधरवड्याअंतर्गत भुसावळ विभागातील एनएसजी -१ ते एनएसजी-४ स्थानकांव्यतिरिक्त ‘स्वच्छ स्टेशन दिवस’ व सर्व स्थानकांवर स्वच्छता कामे करण्यात आली.

रेल्वे प्रशासनातर्फे स्वच्छ रेल पंधरवडा
ठळक मुद्देफुलझाडांची लावली ४०० रोपे प्लॅस्टिकच्या बाटली क्रशर मशीनच्या वापराविषयी जनजागृती
भुसावळ : स्वच्छता पंधरवड्याअंतर्गत भुसावळ विभागातील एनएसजी -१ ते एनएसजी-४ स्थानकांव्यतिरिक्त ‘स्वच्छ स्टेशन दिवस’ व सर्व स्थानकांवर स्वच्छता कामे करण्यात आली.
त्याअंतर्गत भुसावळ येथे कोचिंग कॉम्प्लेक्समध्ये सहायक मंडल यांत्रिक अभियंता शेख असलम जावेद यांच्या नेतृत्वाखाली १५ वृक्ष तथा ४०० फुल झाडे रोपे लावण्यात आली.
भुसावळ रेल्वेस्थानक व मंडळाच्या इतर स्थानकांवर प्लॅस्टिकच्या बाटली क्रशर मशीनच्या वापराविषयी प्रवाशांमध्ये जनजागृती करण्यात आली.