चौगाव येथील किल्ल्याची सफाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2019 02:31 PM2019-04-26T14:31:38+5:302019-04-26T14:31:44+5:30

मराठा शिवमुद्राचा उपक्रम : प्रशासनाने लक्ष देण्याची गरज

Cleaning of the fort at Chaugaon | चौगाव येथील किल्ल्याची सफाई

चौगाव येथील किल्ल्याची सफाई

Next

चोपडा : तालुक्याला ऐतिहासिक वारसा लाभलेला शिवाय छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चरणस्पर्शाने पावन झालेला चौगाव या गावातील गवळी राजाचा किल्याची साफसफाई करण्यात आली.
चोपडा येथील मराठा शिवमुद्रा तसेच भाऊसाहेब महेंद्र पाटील बहुउद्देशीय संस्थेतर्फे गडावर साफ-सफाईची मोहीम राबवण्यात आली. प्रसंगी किल्ल्याच्या आत मध्ये मोडून पडलेले लाकडी तसेच आतमधील पालापाचोळा, प्लॅस्टिक कॅरीबॅग वगैरे श्रमदानातून काढण्यात आल्या. याचबरोबर किल्ले संवर्धनाविषयी जनजागृतीही प्रसंगी करण्यात आली.
किल्ल्यावरील प्लॅस्टिक कचरा वेचून तो पोत्यात भरण्यात आला. जलाशय गवतात लुप्त झाली आहेत. गड किल्ल्याचा भुयारी मार्ग बुजलेल्या अवस्थेत आहे. प्रशासन किल्ला संवर्धनासाठी कुठलेही कामकाज पाहत नसल्याने किल्ल्याविषयी काही लोकांच्या मनात वेगळीच भावना आहे. जसे किल्ल्यात धन वगैरे आहे. त्यामुळे तिथे जागोजागी मोठमोठे खड्डे खोदले आहेत.त्यामुळे किल्ल्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. किल्ला साफसफाई मोहिमेत डॉ.रोहन महेंद्र पाटील, गणेश भागवत पाटील, मिथुन महेंद्र पाटील, विकास ईश्वर निकम, स्वप्नील पाटील, राहुल राजपूत, भाविन चौधरी, अविनाश पाटील (अमळनेर), करण बडगुजर आदी सहभागी झाले होते.

Web Title: Cleaning of the fort at Chaugaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.