कुटुंबिय घरात असतानाही हातसफाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2019 02:42 PM2019-08-19T14:42:10+5:302019-08-19T14:42:55+5:30

कला वसंत नगरात तीन तर अमन पार्कमध्ये बंद घर फोडले : पेट्रोलसह वीस हजार लंपास

 Cleaning while in the family home | कुटुंबिय घरात असतानाही हातसफाई

कुटुंबिय घरात असतानाही हातसफाई

Next

जळगाव : सर्वात जास्त भाषा वैविध्यता जगभरात केवळ भारतातच असल्याचा अभिमान सर्वांना आहे. त्यात विशेष बाब म्हणजे मराठी ही सर्वात प्राचीन भाषा असून जे वेद महिला, क्षुद्रांना समजत नव्हते ते मराठीत अनुवाद झाल्याने ते सर्वांचे झाले. अशा अनेक साहित्याचा विचार केला तर केवळ मराठी साहित्यच सर्वांना समजण्याजोगे असल्याने हेच साहित्य सर्वसमावेशक ठरत आहे, असे स्पष्ट मत ८८व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष तथा राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष तसेच संत साहित्याचे गाढे अभ्यासक प्रा.डॉ. सदानंद मोरे यांनी व्यक्त केले.
सूर्योदय सर्वसमावेशक मंडळाच्या सोळाव्या वर्धापन दिनानिमित्त दलुभाऊ जैन चॅरिटेबल ट्रस्ट प्रायोजित एक दिवसीय पंधरावे राज्यस्तरीय सूर्योदय मराठी साहित्य संमेलन जळगावात झाले. त्यावेळी संमेलनाचे अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना प्रा.डॉ. मोरे हे बोलत होते.
संमेलनाचे उद््घाटक म्हणून इतिहासाचे अभ्यासक डॉ. नरसिंह परदेशी होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून सहाव्या सूर्योदय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष महाकवी सुधाकर गायधनी, कथा कादंबरीकार प्रा.डॉ. संजीव गिरासे, संघपती दलुभाऊ जैन, मंडळाचे अध्यक्ष सतीश जैन उपस्थित होते. उपस्थितांच्याहस्ते दीपप्रज्ज्वालन होऊन साहित्य संमेलनास सुरुवात झाली.
मावळते अध्यक्ष प्रा.डॉ. नागनाथ कोत्तापल्ले हे हजर राहू न शकल्याने दुलभाऊजैन यांच्याहस्ते प्रा.डॉ. मोरे यांच्याकडेअध्यक्षपदाचीसूत्रे सोपविली. प्रास्ताविक मंडळाचे उपाध्यक्ष प्रवीण लोहार यांनी केले.
प्राचीन काळापासून मराठीला राजाश्रय
मराठी भाषा ही अभिजात आहेच. या भाषेची ज्यातून उत्क्रांती झाली ती महाराष्ट्रीय प्राकृत भाषा ही फार जुनी असल्याचे प्रा. डॉ. सदानंद मोरे यांनी सांगितले. ते म्हणाले की, प्राचीन काळापासूनच मराठीतून उच्च दर्जाची साहित्य निर्मिती झाली आहे. इतकेच नव्हे तर संस्कृत साहित्यिकांनीही याच भाषेतील साहित्याचा संस्कृतमध्ये अनुवाद केला व अनेक ठिकाणी मराठी साहित्याची उदाहरणे दिली, एवढे दर्जेदार साहित्य मराठीतून तयार झालेले आहेत. सातवाहन राजांनी मराठी भाषेला राजाश्रय दिला. मात्र त्यानंतर चालूक्य राजांनी महाराष्ट्रातील प्राकृत भाषा काढून घेतली व मराठी भाषेचा ºहास झाल्याचे प्रा. डॉ. मोरे यांनी सांगितले.
जैन धर्मियांकडून मराठीला संजीवनी
चालूक्य राजांमुळे मराठी ºहास झाल्यानंतर खऱ्या अर्थाने महाराष्ट्रात या प्राकृत भाषेला जैन धर्मियांनी संजीवनी दिली व नंतर ती संत ज्ञानेश्वरांपर्यंत टिकून राहिली, असे प्रा. डॉ. सदानंद मोरे यांनी आपल्या मनोगतात नमूद केले. एकूणच जैन धर्मियांचे महाराष्ट्रावर फार मोठे उपकार असल्याचे प्रा. डॉॅ. मोरे यांनी सांगत यादव राजांनी पुन्हा मराठीला राजाश्रय दिल्याचेही त्यांनी सांगितले.
भगवद् गीता प्रथम मराठीत अनुवाद झाली
पूर्वी वेद हे केवळ साहित्यिकांनाच समजत असत. त्यांच्या पत्नींनादेखील ते समजत नव्हते, इतरांची तर वेगळीच स्थिती असायची. त्यानंतर मात्र मराठीतील अनुवादीत साहित्य स्त्रीया क्षुद्रांनाही समजू लागले, असे प्रा. डॉ. मोरे म्हणाले.
यात पहिला धर्मग्रंथ असलेली भगवद् गीता सर्वात प्रथम मराठीत अनुवादीत झाली व ती संत ज्ञानेश्वर यांनी केली. त्यामुळे ती सर्वांची होऊ शकली.
भावी पिढीला संस्कारक्षम बनवा
दलुभाऊ जैन यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, या संमेलनाच्या माध्यमातून खान्देशातील कवी, साहित्यिकांची परंपरा पुढे नेण्याचा प्रयत्न केला जात आहे. आपल्या शिक्षणाच इतरांना लाभ देत आपल्या विचारांनी भावी पिढी संस्कारक्षम बनवा, असे आवाहनही त्यांनी केले. सोबतच वाचन संस्कृती वाढविल्यास साहित्य निर्मितीही होण्यासही मदत होऊ शकते, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
या वेळी पुरस्कार्थींच्यावतीने भगवान भटकर व किशोर पाठक यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन कवी रवींद्र मालुंजकर (नाशिक) यांनी केले.
या संमेलनात थोरांच्या स्मृती जागवणारा जागवू या ‘स्मृती’ हे सत्र प्रा. डॉ. फुला बागुल यांच्या अध्यक्षतेखाली झाले. त्यानंतर कथाकथन, कविसंमेलन, परिसंवाद असे विविध सत्र झाले.
उत्साहात समारोप
कथा कादंबरीकार प्रा.डॉ. संजीव गिरासे यांच्या अध्यक्षतेखाली संध्याकाळी साहित्य संमेलनाचे समारोप सत्र होऊन उत्साहास समारोप झाला.

संमेलनात चिंध्या पांघरुन सोने विकण्याचा प्रयत्न - सुधाकर गायधनी
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी शाळांना सुट्टी देऊन रसिक आणावे लागतात व नंतर अनेक सत्रांमध्ये तर श्रोते शोधावे लागतात, अशी साहित्य संमेलनांची स्थिती आहे. तेथे चिंध्या पांघरुन सोने विकण्याचा प्रयत्न होतो, अशी परखड टीका महाकवी सुधाकर गायधनी यांनी जळगावात केली. या वेळी त्यांनी साहित्य अकादमीचाही समाचार घेत तेथे योग्य माणसांची नियुक्ती करा, अशी मागणी केली.
जळगाव येथे आयोजित एक दिवसीय पंधराव्या राज्यस्तरीय सूर्योदय मराठी साहित्य संमेलनात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. आपल्या कवितेला अभिजात न म्हणणारे काय बोलतील, मीच माझ्या कवितेचा समीक्षक आहे, त्यामुळे ती अभिजातच आहे, असे ठणकावून सांगितले. प्रत्येक कवींनी आपली निर्मिती इतकी दर्जेदार करावी की, कवितेलाच कवीची लाज न वाटता अभिमान वाटला पाहिजे. सोबतच कवींनी आपली प्रतिष्ठा राखली पाहिजे व आपले साहित्य कोणालाही न देता जे आतूर आहे, त्यांनाच ते द्या, असा सल्ला दिला. मी अनेक पुरस्कार नाकारले, काही परतही केले. मात्र येथे देण्यात आलेल्या पुरस्काराने माझा आनंद द्विगुणित झाल्याचे गायधनी यांनी नमूद केले. या वेळी अखिल भारतीय साहित्य संमेलनावर टीका करीत ते म्हणाले की, आजच्या या संमेलनामध्ये जेवढे श्रोते आहे, तेवढेच श्रोते अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात असतात. तेथे तर अक्षरश: श्रोते आणावे लागतात, अशी स्थिती असल्याचे सांगितले. एकूणच काय तर त्या संमेलनात चिंध्या पांघरून सोने विकण्याचा प्रयत्न होत असतो, सोबतच साहित्य अकादमीचे विद्यमान मंडळ शासनाने बरखास्त करावे व योग्य माणसाची तेथे नियुक्ती करावी अशी मागणी केली.
जळगावातून साहित्यास सुरुवात
गायधनी यांनी जळगावशी जुने नाते असल्याचे सांगत आपण येथे टपाल खात्यात नोकरीला होतो व येथून माझ्या साहित्य लेखनास सुरुवात झाली. इतकेच नव्हे ‘देवदूत’ हे जागतिक पातळीवर पोहचलेले साहित्य जळगावातच लिहिले असल्याचे त्यांनी सांगितले. या वेळी मनोगत व्यक्त करण्यापूर्वीच त्यांनी आपली लिहिती लेखणी सूर्योदय सर्वसमावेशक मंडळाचे अध्यक्ष सतीश जैन यांना देऊन त्यांचा सत्कार केला.

Web Title:  Cleaning while in the family home

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.