पाळधी येथील प्राचिन बारवची स्वच्छता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2019 03:52 PM2019-06-06T15:52:26+5:302019-06-06T15:52:58+5:30
शिवसन्मान प्रतिष्ठाणने केले श्रमदान
पाळधी ता.जामनेर- शिवसन्मान प्रतिष्ठाणने पाळधी येथील महादेव मंदिर परिसरात असलेल्या प्राचिन बारव मधील साचलेला कचरा आणि गाळ काढत स्वच्छता केली़
पाळधी येथे महादेव मंदिराजवळ प्राचिन बारव (पायऱ्या असलेली पाण्याची विहीर) आहे यात पावसाळ्यात पाणी असते आजूबाजूचे रहिवाशी तसेच मंदिरात येणाºया भाविकांची यातून पाण्याची गरज पूर्ण होते. या बारवमध्ये बराच कचरा व गाळ साचलेला होता, हा संपूर्ण बारव स्वच्छ करण्याचे करण्यात आले. यापूर्वी त्यांनी स्मशानभूमीची स्वछता केली होती त्यांच्या या स्वछता अभियानाचे पाळधीसह परिसरात सर्वत्र कौतुक होत आहे.
याप्रसंगी शिवसन्मान प्रतिष्ठानचे संस्थापक-अध्यक्ष विश्वजितराजे पाटील, पाळधी शहर अध्यक्ष रविंद्र आवटे, शहर उपाध्यक्ष निलेश शेळके, शहर कार्याध्यक्ष हितेश जैन, गजानन गुरव, प्रशांत शिंपी, गजानन शेळके, विश्वनाथ धोबी, किरण बोरसे, स्वप्नील पाटील, अनिकेत शिंपी, हर्षल पाटील, दत्तु धनगर, गजानन चौधरी, सुनिल चौधरी, प्रविण माळी, प्रल्हाद कोळी, सागर माळी आदी श्रमदाते उपस्थित होते.