अजिंठा लेणी परिसरात राबविले स्वच्छता शिबिर
By admin | Published: January 17, 2017 11:46 PM2017-01-17T23:46:45+5:302017-01-17T23:46:45+5:30
जपानच्या वाकायामा प्रांताच्या शिष्टमंडळाची भेट : उपक्रमाचे पर्यटकांकडून कौतुक
फर्दापूर : जगप्रसिद्ध अजिंठा लेणीच्या जतन, संवर्धन व प्रचार प्रसारासाठी जपानच्या वाकायामा प्रांताच्या शिष्टमंडळाने आज (१७) रोजी अजिंठा लेणी- फर्दापूर टि.पॉर्इंट येथील अजिंठा लेणी अभ्यागत केंद्रास भेट देऊन तेथे शालेय विद्यार्थ्यांसोबत एक दिवसीय स्वच्छता शिबिराचे आयोजन केले होते.
या शिबिराकरिता वाकोद (ता.जामनेर) येथील राणीदानजी जैन व श्रीमती कांताबाई जैन उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांची निवड केली होती. जपानच्या शिष्टमंडळाने विद्यार्थ्यांसोबत संवाद साधताना सांगितले की सन-१९८३ मध्ये भारतामधील जगप्रसिद्ध अजिंठा लेणीला जागतिक वारसा म्हणून पहिल्यांदा घोषित करण्यात आले होते. जगातील दोन जागतिक वारसा असलेले पर्यटनस्थळे आज ही स्वच्छतेच्या दृष्टीने महत्त्वाची असून स्वच्छता नसल्याने पर्यटकांना त्रास होऊ नये, त्यामुळे ही समस्या सोडविण्याच्या दृष्टीने आम्ही अजिंठा लेणी परिसरात काही उपाययोजना करण्याचे ठरविले आहे. या अंतर्गत ‘‘अजंता मेघा क्लिन अप’’ या उपक्रमातून आमच्या या स्वच्छता मिशनमध्ये अजिंठा लेणी परिसरातील नागरिकांना व विद्यार्थ्यांना सामावून घेण्याचा निर्णय घेतला. भारत सरकार आणि जपानच्यासंयुक्त विद्यमानाने दर महिन्यातून एकदा या परिसरात स्वच्छता कॅम्पेन राबविण्यात येत आहे. जपानच्या पथकात योशियो यामाशिता, हिराई सान यांचा समावेश होता. यावेळी महाराष्टÑ राज्य पर्यटन विकास महामंडळाचे प्रादेशिक उपमहाव्यवस्थापक चंद्रशेखर जैस्वाल, डी.एस.दानवे, अनसहेब माने, योगेश राणे, तुषार तिंगोटे, अण्णासाहेब शिंदे, प्रशांत सवई, माया नरसापूर, चंद्रशेखर राठोड, पर्यवेक्षक पी. एस. पाटील, प्रा.नितीन पाटील, मंगेश बी. लोखंडे विद्यार्थी उपस्थित होते. विद्यार्थ्यांचे चार गटात विभागणी करून एक गट अजिंठा लेणीमध्ये तर उर्वरीत तीन गट अजिंठा विजिटिंग सेंटर तसेच टी पॉर्इंट परिसर अशी विभागाणी करून परिसरातील सर्व कचरा उचलून परिसर स्वच्छ करण्यात आला. (वार्ताहर)
प्लॅस्टिक बैगा वापरू नका, यावर सांगितले गेले की प्लास्टिकविषयी ‘‘रिफ्यूज रिज्युज रियुज आणि रिसाइकल’’ याचा अर्थ प्लास्टिकचा नकार करा, वापर कमी करा, पुन: वापरा शेवटी भंगारवाल्याला द्या, अशी चतुसूत्र सांगत येथील मेघा क्लीन आप कैम्पेनचा शुभारंभ याप्रसंगी करण्यात आला.