भुईकोट किल्ला संवर्धन समितीकडून स्वच्छता मोहीम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2018 05:07 PM2018-08-13T17:07:43+5:302018-08-13T17:08:20+5:30
पारोळा येथे राजे शिवबा प्रतिष्ठानने घेतला पुढाकार
पारोळा, जि.जळगाव : येथील भुईकोट किल्ल्याच्या जतन आणि संवर्धनासाठी राजे शिवबा प्रतिष्ठान संभाजी नगर यांच्यातर्फे स्वछता मोहीम राबविण्यात आली. यावेळी आधी शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे पूजन करण्यात आले. नंतर किल्ल्याच्या परिसरात वृक्षारोपण मान्यवरांच्याहस्ते करण्यात आले.
प्रसंगी गावातील युवकांच्या माध्यमातून किल्ला परिसरात स्वछता मोहीम राबविण्यात आली. अनावश्यक गावात काटेरी झुडपे तोडून परिसर चकाचक करण्यात आला. टप्प्याटप्प्याने किल्ल्यातील सर्व घाण स्वच्छ केली जाईल. किल्ल्याच्या प्रवेशद्वार जवळ असलेली दुर्गंधी हीदेखील मोडली जाईल. किल्ल्याच्या बुुरुजच्या आडोशाला लघुशंका आणि शौचास बसणाऱ्यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत या राजे शिवबा प्रतिष्ठानच्या पदाधिकारी यांच्याकडून करण्यात येणार आहे. किल्ल्याच्या परिसरात चालू असलेली अवैद्य व्यवसायाची गंभीर दाखल घेतली जाईल आणि पुरातन खात्याची परवानगी घेऊन मुख्य दरवाजा हा वेळा निश्चित करून मग किल्ल्यात प्रवेश राहणार आहे.
या भुईकोट किल्ल्याचे गतवैभव कसे प्राप्त करून देता येईल हा आमचा प्रामाणिक प्रयत्न राहणार आहे, असे यावेळी राजे शिवबा प्रतिष्ठानप्रमुख सुरेश मराठे व वर्षा हिरे यांनी बोलून दाखवले. प्रमुख पाहुणे म्हणून किल्ले (लळींग) स्वसंरक्षण समिती अध्यक्ष सुरेश मराठे व वर्षा हिरे धुळे, जळगाव जिल्हा संपर्कप्रमुख आशिष पाटील, अमोल पाटील, मनीष मराठे, ऊल्हास पाटील, सागर महाजन, राकेश महाजन, गोविंदा महाजन आदी उपस्थित होते.