जवखेडेसीम येथील चिरेबंदी विहिरीची साफसफाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2018 04:34 PM2018-08-24T16:34:05+5:302018-08-24T16:34:32+5:30
ग्रामस्थांनी केले तरुणांचे कौतुक
निपाणे, ता.एरंडोल, जि.जळगाव : येथून जवळच असलेल्या जवखेडेसीम, ता.एरंडोल येथे तरुणांनी पुरातन विहिरीची साफसफाई केली. जवळपास २० ते २५ फूट या विहिरीची खोली आहे.
जवखेडेसीम येथील शेकडो वर्षे पूर्वीची पुरातन काळातील चिरेबंदी विहीर आहे. या विहिरीत शनि देवाची मूर्ती आहे. गावात अनेक सरपंच आले आणि गेले, परंतु त्या चिरेबंदीकडे कोणीही लक्ष दिले नाही. गावातील रहिवाशी शिक्षक सुधाकर रामदास पाटील, ज्ञानेश्वर बळीराम पाटील व पोलीस निरीक्षक संतोष जालम पाटील यांनी जवखेडेसीमचे लोकनियुक्त सरपंच दिनेश आमले यांना सांंिगतले की, आपल्या गावातील शेकडो वर्षे पूर्वीची पुरातन काळातील चिरेबंदी विहीर ही पूर्ण दूषित पाण्याने व काडी कचऱ्याने भरलेली आहे. त्यात शनि मूर्तीदेखील आहे. यावर सरपंच दिनेश आमले यांनी लगेच त्याच दिवशी दखल घेतली व गावातील तरुण मित्रमंडळी गुलाब पाटील, शिवदास पाटील, भावडू पाटील, अमृत पाटील, राहुल पाटील, हर्षल शिंदे, कैलास गोसावी, मनोज पाटील, नीलेश भदाणे, गुलाब आमले यांच्यासह अनेक तरुणांनी चिरेबंदी विहिरीची पूर्ण साफसपाई केली व शनिमूतीर्ची पूजा अर्चा केली. या सर्वांचे ग्रामस्थांकडून कौतुक होत आहे.