अमळनेर येथे स्वच्छता रॅली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2019 09:28 PM2019-09-18T21:28:25+5:302019-09-18T21:28:31+5:30

अमळनेर : महात्मा गांधींच्या १५० व्या जयंतीपासून सुरू करण्यात आलेल्या स्वछता अभियानास ५ वर्षे पूर्ण झाली. यानिमित्त शासनाने प्लास्टिक ...

Cleanliness rally at Amalner | अमळनेर येथे स्वच्छता रॅली

अमळनेर येथे स्वच्छता रॅली

Next

अमळनेर : महात्मा गांधींच्या १५० व्या जयंतीपासून सुरू करण्यात आलेल्या स्वछता अभियानास ५ वर्षे पूर्ण झाली. यानिमित्त शासनाने प्लास्टिक मुक्त दिवाळी साजरी करण्यासाठी स्वच्छता हीच सेवा ही मोहीमसुरू केली आहे. याअंतर्गत येथील नगरपालिका व सानेगुरुजी शाळेच्या वतीने स्वछता रॅली काढण्यात आली.
११ सप्टेंबर ते १ आॅक्टोबरपर्यंत प्लॅस्टिक बंदी जनजागृती करण्यात येत आहे. तसेच २ आॅक्टोबर रोजी लोकसहभागातून श्रमदान केले जाणार आहे. ३ ते २७ आॅक्टोबरदरम्यान प्लॅस्टिक मुक्त दिवाळी साजरी करण्यात येणार असल्याचे मुख्याधिकारी शोभा बाविस्कर यांनी सांगितले. त्याचाच एक भाग म्हणून शहरात सानेगुरुजी नूतन माध्यमिक व कन्या विद्यालयातर्फे स्वछता रॅली काढण्यात आली. शाळेपासून तहसील कार्यालय, मंगल कार्यालय आदी भागातून रॅलीच्या माध्यमातून जनजागृती करण्यात आली. यावेळी मुख्यध्यपक एस.डी.देशमुख, मुख्याध्यापिका अनिता बोरसे, सुनील पाटील, डी.ए.धनगर, रजनी सोनवणे, विलास चौधरी, डी.ए.महाजन, शारदा उंबरकर यांच्यासह विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.

Web Title: Cleanliness rally at Amalner

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.