भुसावळ, बडनेरा, अमरावती रेल्वे स्थानकांना स्वच्छतेचे मानांकन
By admin | Published: May 18, 2017 12:19 PM2017-05-18T12:19:49+5:302017-05-18T12:19:49+5:30
मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातील तीन ए-श्रेणीतील रेल्वे स्थानकांना स्वच्छ रेल्वे, स्वच्छ भारताचे मानांकन प्राप्त झाले आहे.
ऑनलाइन लोकमत
भुसावळ, जळगाव, दि. 18 - देशभरात अस्वच्छतेबाबत भुसावळ शहराचा दुसरा क्रमांक आल्याने सर्वाचीच मान झुकली असताना मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातील तीन ए-श्रेणीतील रेल्वे स्थानकांना स्वच्छ रेल्वे, स्वच्छ भारताचे मानांकन प्राप्त झाले आहे. यात विशेष म्हणजे बडनेरा रेल्वे स्थानक टॉप-टेनमध्ये आले आहे तर भुसावळ आणि अमरावती या स्थानकांना वर्गवारीनुसार 11 आणि 24वे स्थान मिळाले आहे.
भारतीय रेल्वे प्रशासनाकडून अखिल रेल्वेतील ए-वन व ए-श्रेणीतील 407 रेल्वे स्थानकांचे स्वच्छतेबाबत सव्रेक्षण करण्यात आले होते. रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी ‘थर्ड पार्टी ऑडिट रिपोर्ट’ स्टेशनवरील स्वच्छतेवर आणि स्वच्छ रेल पोर्टलचे अनावरण केले त्यात त्यांनी सच्छतेचे मानांकन प्राप्त स्थानकांची नावे जाहीर केली. यात भुसावळ विभागातील बडनेरा स्थानक टॉपटेनमध्ये आले आहे.
स्वच्छतेबाबतचे सर्वेक्षण क्वालिटी कॉन्सिल ऑफ इंडिया (क्यूसीआय) पूर्ण केले आहे. त्यांच्या भागीदारांनी भारतीय रेल्वेतील तब्बल 407 प्रमुख रेल्वे स्थानकांचे (75 ए -1 श्रेणी आणि 332 ए श्रेणी स्थानके) सर्वेक्षण केले आहेत. पाकिर्ंगमधील स्वच्छतेची प्रक्रिया, मुख्य प्रवेश क्षेत्र, मुख्य व्यासपीठ, प्रतिक्षालय, (33.33 टक्के) या क्षेत्रातील स्वच्छतेच्या क्यूसीआय अभ्यासिकांद्वारे (33.33 टक्के) आणि प्रवासी अभिप्राय (33.33 टक्के).यावर करण्यात आले.
बडनेरा अव्वल
एकूण रँकमध्ये बडनेरा स्थानक 11व्या, झोनल रँकमध्ये दुस:या व कॅटेगिरी रँकमध्ये सहाव्या स्थानी आहे. त्यापाठोपाठ अमरावती स्थानक एकूण रँक 22, झोनल 4 व कॅटेगिरी रँकमध्ये 11व्या स्थानावर आहे. भुसावळ स्थानक एकूण रँकमध्ये 42, झोनलमध्ये आठ आणि कॅटेगिरी रँकमध्ये 24व्या स्थानावर आहे.
बडनेरा रेल्वे स्थानक स्वच्छतेबाबत पहिल्या दहामध्ये आले आहे. याचा मोढा आनंद आहे. हे ‘टीम वर्क’आहे. सर्वत्र चांगली सफाई होत आहे. भुसावळ व अमरावती स्थानकालाही मानांकन मिळाले आहे. स्वच्छतेबाबत अधिक उत्साहाने काम केले जाईल.
- आर.के.यादव, डीआरएम, भुसावळ.