चाळीसगाव शहरातील पाच मुख्य रस्त्यांच्या कामाचा मार्ग मोकळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2021 04:12 AM2021-07-19T04:12:22+5:302021-07-19T04:12:22+5:30

शहरातील व्यापारी बांधवांनी रस्त्यांच्या दुर्दशेबाबत खासदार उन्मेश पाटील यांची त्यांच्या जनसंपर्क कार्यालयात भेट घेतली. यावेळी खासदार उन्मेश पाटील ...

Clear the way for the work of five main roads in Chalisgaon city | चाळीसगाव शहरातील पाच मुख्य रस्त्यांच्या कामाचा मार्ग मोकळा

चाळीसगाव शहरातील पाच मुख्य रस्त्यांच्या कामाचा मार्ग मोकळा

Next

शहरातील व्यापारी बांधवांनी रस्त्यांच्या दुर्दशेबाबत खासदार उन्मेश पाटील यांची त्यांच्या जनसंपर्क कार्यालयात भेट घेतली. यावेळी खासदार उन्मेश पाटील यांनी ही माहिती दिली. बैठकीला नगराध्यक्षा आशालता चव्हाण, उपमुख्याधिकारी स्नेहल फडतरे, गटनेते संजय पाटील, नगरसेवक नितीन पाटील, विश्वासराव चव्हाण, व्यापारी आघाडीचे अजय वाणी, पालिका अधिकारी भूषण लाटे, हरेश जैन, प्रीतेश कटारिया, राहुल करवा उपस्थित होते.

यावेळी व्यापारी बांधवांनी रस्त्यावर झालेल्या धुळीमुळे, चिखलामुळे आम्ही त्रस्त असून, आमची अडचण आपणच दूर कराल, अशी विनंती व्यापारी बांधवांनी खासदार पाटील यांना केली आहे. किराणा भुसार व्यापारी असोसिएशनचे संचालक अजय वाणी, श्याम शिरोडे, सोमनाथ ब्राह्मणकार, लक्ष्मण दुसे, पप्पू दुसे, राजू पाटणी, जितेंद्र येवले, श्याम वाणी, दीपक वाणी, कापड असोसिएशनचे प्रीतेश कटारिया, हार्डवेअर असोसिएशनचे विवेक येवले, स्वप्नील धामणे व इतर व्यापारी बांधव उपस्थित होते.

दीड कोटींच्या कामातून दुरुस्ती

यावेळी खासदार उन्मेश पाटील यांनी दीड कोटी रुपयांच्या खर्चातून लगेच तातडीने दुरुस्ती सुरू करावी यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातून रस्त्यांची तांत्रिक मान्यता तातडीने मिळवून दिली जाईल, जिथे अडचण असेल ती तात्काळ दूर करा; परंतु येत्या आठवडाभरात ही दुरुस्तीची कामे संपवा, असे आदेश यावेळी खासदार पाटील यांनी प्रशासनाला दिले.

180721\18jal_6_18072021_12.jpg

चाळीसगाव येथे बैठकीत मार्गदर्शन करताना खासदार उन्मेश पाटील, सोबत नगराध्यक्षा आशालता चव्हाण, स्नेहलता फडतरे, संजय पाटील व इतर.

Web Title: Clear the way for the work of five main roads in Chalisgaon city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.