फलक फाडल्याप्रकरणी कोठडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2017 12:42 AM2017-01-16T00:42:32+5:302017-01-16T00:42:32+5:30
भालोद : दुस:या दिवशी दुकाने बंद
फैजपूर/भालोद : भालोद, ता.यावल येथील फलक फाडल्याप्रकरणी दाखल असलेल्या गुन्ह्यात पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या 10 संशयितांपैकी तीन आरोपींना अटक केल्यानंतर रविवारी भुसावळच्या अतिरिक्त सत्र न्यायालयात हजर केले असता त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली़
दरम्यान, रविवारी भालोद गावातील दुकाने बंदच असल्याचे चित्र होत,े तर पुन्हा दोन गट सायंकाळी साडेसहाच्या सुमारास समोरासमोर आले. मात्र पोलिसांनी सतर्कता दाखवत शांतता प्रस्थापित केली़
शनिवारी भालोद येथे फलक फाडल्यानंतर तणाव निर्माण झाला होता. यात परस्परविरोधी तक्रारीवरून 47 जणांविरुद्ध दंगलीचा गुन्हा दाखल झाला होता. याप्रकरणी पोलिसांनी 10 संशयितांना ताब्यात घेतले. त्यापैकी तुषार सुधाकर झांबरे, सतीश रवींद्र खंबायत, जीवन सोपान इंगळे यांना अटक करण्यात आली.
दरम्यान, येथील परिस्थिती नियंत्रणात असून, बंदोबस्त कायम आहे. रविवारी अपर पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील, फैजपूर डीवायएसपी अशोक थोरात यांनी भालोद येथे भेट देऊन परिस्थिती जाणून घेतली.
तपास डीवायएसपी अशोक थोरात, सहाय्यक पोलीस निरीक्षक सार्थक नेहेते, फौजदार मनोहर मोरे व सहकारी करीत आहेत. (वार्ताहर)