सूर्योदयच्या ऑनलाईन साहित्य उत्सवाचा समारोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2021 04:15 AM2021-03-21T04:15:55+5:302021-03-21T04:15:55+5:30
जळगाव : सूर्योदय सर्वसमावेशक मंडळाच्या अठराव्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित ऑनलाईन साहित्य उत्सवाचा शनिवारी सोळावे राज्यस्तरीय सूर्योदय मराठी साहित्य संमेलनाध्यक्ष ...
जळगाव : सूर्योदय सर्वसमावेशक मंडळाच्या अठराव्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित ऑनलाईन साहित्य उत्सवाचा शनिवारी सोळावे राज्यस्तरीय सूर्योदय मराठी साहित्य संमेलनाध्यक्ष सुप्रसिद्ध लेखक डाॅ. म. सु. पगारे यांच्या व्याख्यानाने झाला.
टवाळा आवडे विनोद या विषयावर त्यांनी संवाद साधला. महेश सूर्यवंशी यांनी डाॅ. पगारे यांचा परिचय करून दिला. त्यांनी विनोदाचे प्रकार सांगितले, कोटी, अतिशयोक्ती, श्लेष अलंकार, वर्णनात्मक, कथनात्मक, प्रबोधनात्मक, अश्लील, प्रासंगिक हे सर्व सांगताना विनोदासाठी डोळे, चेहऱ्याचे हावभाव, शरीराच्या विशिष्ट हालचाली याद्वारे हास्य कसे उमलते हे स्पष्ट केले. माणसाचे जगणे, वागणे, बोलणे, चालणे, व्यवहार, लेखन, भाषण, श्रवण यातील विसंगतीतून निर्माण होणाऱ्या विनोदांची कौशल्यपूर्ण उधळण आपल्या व्याख्यानाद्वारे केली. अध्यक्ष सतीश जैन यांनी आभार व्यक्त केले.