५१ लाखांच्या ‘बादल’ची निघाली सारंगखेड्याला स्वारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2019 08:25 PM2019-12-09T20:25:36+5:302019-12-09T20:27:55+5:30

काही वर्षांपूर्वी सारंगखेड्याच्या यात्रेतून आणलेल्या घोड्याला कुटुंबातील सदस्याप्रमाणे सांभाळत सोनवणे कुटुंबाने आपला छंद जोपासला आहे. जीवापाड प्रेम लावून वाढविलेला ‘बादल’ नावाचा घोडा शहरात चर्चेचा विषय बनला आहे. विशेष म्हणजे हा बादल घोडा तब्बल ५१ लाख रुपये किंमतीचा आहे. या बादलची स्वारी आता सोमवारी सारंगखडा यात्रोत्सवासाठी निघाली आहे.

A 'cloud' of 3 lakhs rides to the Sarangkhed | ५१ लाखांच्या ‘बादल’ची निघाली सारंगखेड्याला स्वारी

५१ लाखांच्या ‘बादल’ची निघाली सारंगखेड्याला स्वारी

googlenewsNext
ठळक मुद्देभडगावात सध्या बादलचीच चर्चावर्षानुवर्षे जोपासला घोडेपालनाचा छंदसारंगखेड्याचा बाजार देशात प्रसिद्ध

अशोक परदेशी
भडगाव, जि.जळगाव : काही वर्षांपूर्वी सारंगखेड्याच्या यात्रेतून आणलेल्या घोड्याला कुटुंबातील सदस्याप्रमाणे सांभाळत सोनवणे कुटुंबाने आपला छंद जोपासला आहे. जीवापाड प्रेम लावून वाढविलेला ‘बादल’ नावाचा घोडा शहरात चर्चेचा विषय बनला आहे. विशेष म्हणजे हा बादल घोडा तब्बल ५१ लाख रुपये किंमतीचा आहे. या बादलची स्वारी आता सोमवारी सारंगखडा यात्रोत्सवासाठी निघाली आहे.
मुळचे बाळद येथील असलेले व सध्या भडगाव येथे वास्तव्यास असलेले अ‍ॅड.आप्पासाहेब सोनवणे आणि त्यांचे मोठे बंधू गंगाराम सोनवणे हे येथे बाळद रोडला राहतात. आप्पासाहेब वकिली तर गंगाराम सोनवणे हे लोहारी कामे करुन आपली उपजिविका भागवितात.
यावर्षी त्यांच्याकडे असलेला बादल हा घोडा शहरात नव्हे तर परिसरात चर्चेचा विषय बनलेला आहे. अ‍ॅड.सोनवणे यांनी बादलला याच सारंगखेड्याच्या यात्रेतूनच गेल्या साडेतीन वर्षांपूर्वी आणला होता. पांढरा शुभ्र बादल हा मारवड जातीचा असून साडेपाच फुटावर उंच आहे. सोनवणे कुटुंबिय त्याच्या खुराकाचीही काळजी घेतात. न चुकता दररोज योग्य प्रमाणात खुराख देऊन रपेट मारतात.
घोडा म्हटले की त्यात ५२ खोडी आल्या. परंतु या बादलमध्ये अशी एकही खोड नाही, असे सोनवणे यांनी सांगितले.
यावर्षी बादल सारंगखेड्यात भरविण्यात येणाऱ्या चेतक फेस्टिवलमध्ये एक नंबर येणारच आणि म्हणून त्याची किंमत ५१ लाख रुपये मिळण्याची आशा सोनवणे यांना आहे.
सन २०११ मध्ये भरविण्यात आलेल्या चेतक फेस्टिवलमध्येही त्यांच्या घोड्याला पहिला क्रमांक मिळाला होता, अशी माहिती सोनवणे यांनी दिली.

सारंगखेड्याचा बाजार देशात प्रसिद्ध
या कुटुंबाची वर्षानुवर्षे (सारंगखेडा ता.शहादा, जि.धुळे) या गावाशी नाळ जोडली गेलेली आहे. दरवर्षी असलेल्या यात्रोत्सवाचे वैशिष्ट्य म्हणजे या ठिकाणी देशातील सगळ्यात मोठा घोड्यांचा बाजार भरविला जातो. याच बाजारातून घोड्याचे शिंगरू आणून त्याला स्वत:च्या मुलाप्रमाणे सांभाळ करून वाढविणे आणि एक-दोन वर्षांनंतर त्याला विकून पुन्हा दुसरे शिंगरू विकत घेणे हा त्यांचा छंद आहे. तो त्यांनी अनेक वर्षांपासून जोपासला देखील.

Web Title: A 'cloud' of 3 lakhs rides to the Sarangkhed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.