चाळीसगावला ढगाळ वातावरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2020 03:28 PM2020-12-12T15:28:27+5:302020-12-12T15:30:39+5:30

गेल्या तीन दिवसांपासून वातावरणासारखा बदल होत असून शनिवारी दिवसभर ढगाळ वातावरण होते.

Cloudy weather in Chalisgaon | चाळीसगावला ढगाळ वातावरण

चाळीसगावला ढगाळ वातावरण

Next
ठळक मुद्देगारठा वाढला : शनिवारी दिवसभर सूर्यदर्शन नाहीबिडगाव परिसरात पावसाची रिपरिप
कमत न्यूज नेटवर्कचाळीसगाव : गेल्या तीन दिवसांपासून वातावरणासारखा बदल होत असून शनिवारी दिवसभर ढगाळ वातावरणाची चादर आच्छादली गेली होती. गारठाही वाढला आहे. दिवसभर सूर्यदर्शन झालेच नाही. अवकाळी पावसाचे संकट येते की काय? या धास्तीने शेतकरी मात्र चिंतातूर झाले आहे.चाळीसगाव परिसरात गेल्या तीन दिवसांपासून वातावरणात बदल होत आहे. मध्यंतरी गायब झालेल्या थंडीने शनिवारी कमबॅक केले. दिवसभर सूर्यदर्शन न झाल्याने थंडगार वारे वाहत होते. अचानक थंडी आल्याने नागरिकांनी स्वेटर, मफलर, कानटोपी असे लोकरीचे कपडे कपाटातून बाहेर काढले. दिवसभर थंडगार वारे वाहत असल्याने वर्दळीवर काहीसा परिणाम झाल्याचे दिसून आले. सद्यस्थितीत परिसरात कांदा लागवड सुरु आहे. गत महिन्यात लागवड झालेल्या रोपांसाठी ही थंडी फायदेशीर असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. अवकाळी....नको रे देवा !यावर्षी परतीच्या पावसाने झोडपले. कोरोनाही परिक्षा घेतोच आहे. त्यात पुन्हा वातावरण बदलत असल्याने अवकाळी पाऊस येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सद्यस्थिती पाणीसाठा मुबलक असल्याने रब्बी हंगामाला पोषक वातावरण आहे. मात्र अवकाळी पावसाने वर्दी दिल्यास रब्बी पेऱ्याला फटका बसू शकतो. दरम्यान शनिवारी दुपारी तीन वाजता काही भागात भुरभुर हलक्या सरीही कोसळल्या. ऐन हिवाळ्यात पावसाची रिपरिपऐन हिवाळ्यात बिडगाव (ता.चोपडा) परिसरात गेल्या दोन दिवसांपासून पावसाची रिपरिप सुरू झाली असून त्याचा रब्बी पिकांना मोठा फटका बसणार असल्याने अस्मानी संकटाने शेतकरी पुन्हा होरपळला जाऊन आर्थिक संकटात सापडणार आहे. बिडगावसह परिसरातील मोहरद, वरगव्हान, देवगाव, पारगाव, लोणी, पंचक खर्डी, पुणगाव, मितावली आदी गावांना पावसाळ्यात अतिपावसाने झोडपून काढल्याने खरीपाचा हंगाम वाया गेला व शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला.

Web Title: Cloudy weather in Chalisgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.