जळगावात ढगाळ वातावरणाने वाढविली शेतकºयांची चिंता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2018 12:59 PM2018-03-06T12:59:59+5:302018-03-06T12:59:59+5:30
पावसाचा शिडकाव
आॅनलाइन लोकमत
जळगाव, दि. ६ - उत्तर भारतात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने त्याचा हवामानावर परिणाम होऊन जळगावातही सोमवारी ढगाळ वातावरण होते. या सोबतच सकाळी शहर परिसरात काही भागात पावसाचा शिडकाव झाला. यामुळे शेतकºयांची पुन्हा चिंता वाढली आहे.
उत्तर भारतासह छत्तीसगड ते कर्नाटकचा उत्तर भाग या दरम्यान कमी दाबाचा पट्टा निर्माण होऊन तो विदर्भाच्या काही भागात दाखल होणार असल्याचे हवामान खात्याचे म्हणणे आहे. त्यामुळे विदर्भालगत असलेल्या जळगाव जिल्ह्यातही याचा परिणाम जाणवत असून सोमवारी सकाळपासूनच ढगाळ वातावरण तयार झाले होते. यामध्ये सकाळी पावणे दहा वाजेच्या सुमारास जळगाव शहरात काही भागात पावसाचा शिडकाव झाला. या बदलत्या वातावरणामुळे काही ठिकाणी गारांचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे.
गेल्या महिन्यातच गारपिटीमुळे रब्बी पिकांचे नुकसान झाल्याने शेतकरी हादरला. त्यात आता पुन्हा ढगाळ वातावरण होऊन गारपिटीच्या भीतीने शेतकरी चिंतीत झाला आहे.