दीपनगर वीज केंद्रात कोळसा टंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 4, 2017 06:04 PM2017-10-04T18:04:09+5:302017-10-04T18:08:18+5:30

भुसावळ,दि.४ : महाजनकोच्या दीपनगर येथील वीज निर्मिती केंद्राला सध्या कमी कोळसा मिळत आहे. कोळसा टंचाईमुळे हा परिणाम झाल्याचे सूत्रांनी सांगितले. दरम्यान, दीपनगर वीज निर्मिती केंद्राला सध्या रोज सहा रेक कोळशाची गरज असता चार रेक कोळसा मिळत आहे.

Coal shortage in Deepanagar power station | दीपनगर वीज केंद्रात कोळसा टंचाई

दीपनगर वीज केंद्रात कोळसा टंचाई

Next
ठळक मुद्देदीपनगर वीज केंद्रात सध्या ३७ हजार मे.टन.इतका कोळसा शिल्लक आहे.वीज केंद्रातील ५०० मेगावॅट क्षमतेचे दोन संच कार्यान्वितएका रेकला ५९ डबे व त्यात ३६ मे.टन कोळसा येतो.

आॅनलाईन लोकमत
भुसावळ,दि.४ : महाजनकोच्या दीपनगर येथील वीज निर्मिती केंद्राला सध्या कमी कोळसा मिळत आहे. कोळसा टंचाईमुळे हा परिणाम झाल्याचे सूत्रांनी सांगितले. दरम्यान, दीपनगर वीज निर्मिती केंद्राला सध्या रोज सहा रेक कोळशाची गरज असता चार रेक कोळसा मिळत असल्याची माहिती मुख्य अभियंता आर.आर.बावस्कर यांनी ‘लोकमत’ला दिली. दरम्यान, दीपनगर वीज केंद्रातील ५०० मेगावॅट क्षमतेचे दोन संच कार्यान्वित आहेत. त्यातून ६०० मेगावॅट वीज निर्मिती सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली.
दरम्यान, अशा परिस्थितीतही दीपनगर वीज केंद्राकडे ३७ हजार टन कोळशाचा साठा असल्याची माहिती त्यांनी दिली.
५०० मेगावॅटच्या दोन संचासाठी रोज रेल्वेचे सहा रेक भरुन कोळसा लागतो. मात्र सध्या देशात व राज्यात कोळशाची समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे मागणीपेक्षा कमी कोळसा मिळत आहे, ही स्थिती फार दिवस राहणार नाही. यात लवकरच बदल होऊन पुरेसा कोळसा मिळेल,असे त्यांनी सांगितले.
एका रेक मध्ये ३६ मे.टन कोळसा येतो. एका रेकला ५९ डबे असतात. आपल्याला चार रेक मिळता, असे त्यांनी सांगितले.
 

Web Title: Coal shortage in Deepanagar power station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.