लाचखोर तलाठय़ासह कोतवाल जाळ्यात
By admin | Published: March 3, 2017 12:32 AM2017-03-03T00:32:07+5:302017-03-03T00:32:07+5:30
कोचूर : जळगावी एसीबीची कारवाई
भुसावळ : सातबारा उता:यावर सागाच्या झाडांची नोंद करण्यासाठी 400 रुपयांची लाच मागणा:या कोचूर (ता़रावेर) येथील तलाठय़ासह कोतवालास जळगावच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ अटक केली़ गुरुवारी ही कारवाई करण्यात आली.
तलाठी विजय शंकर वानखेडे (वय 51) व कोतवाल समाधान प्रेमचंद तायडे (41) अशी लाचखोर आरोपींची नावे आहेत़ विशेष म्हणजे तलाठी कार्यालयातच आरोपींना रंगेहाथ अटक करण्यात आली़
तक्रारदाराची बोरखेडासीम, ता़ रावेर येथे गट नंबर नऊ, क्षेत्र ़075 आर ही शेतजमीन आह़े त्यावर सागाची 50 झाडे लावण्यात आली आहेत़ त्याची सातबारा उता:यावर नोंद नसल्याने ती लावण्यासाठी आरोपींनी 500 रुपयांच्या लाचेची मागणी केली़ तक्रारदाराने जळगाव एसीबीकडे तक्रार केल्यानंतर गुरुवारी दुपारी सापळा लावण्यात आला़
आरोपींविरुद्ध सावदा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जळगाव एसीबीचे पोलीस उपअधीक्षक पराग सोनवणे व पथकाने ही कारवाई केली़