आचारसंहिता संपूर्ण जिल्हाभरात लागू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2020 04:32 AM2020-12-16T04:32:30+5:302020-12-16T04:32:30+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : जिल्हाभरातील ७८३ ग्रामपंचायतींची सार्वत्रिक निवडणूक असल्याने संपूर्ण जिल्ह्यामध्ये आचारसंहिता लागू असेल, असे आदेश जिल्हाधिकारी ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : जिल्हाभरातील ७८३ ग्रामपंचायतींची सार्वत्रिक निवडणूक असल्याने संपूर्ण जिल्ह्यामध्ये आचारसंहिता लागू असेल, असे आदेश जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी १२ डिसेंबर रोजी काढले आहेत.
निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यापासून ते निवडणुकीचा निकाल जाहीर होईपर्यंत लागू राहणार आहे. असे निवडणूक आयोगाकडून आदेशीत करण्यात आले आहे.
११५३ पैकी ७८३ ग्रामपंचायतींसाठी १५ जानेवारी २०२१ रोजी मतदान होणार असून १८ जानेवारी रोजी मतमोजणी होणार आहे. दरम्यान, ज्या जिल्ह्यांमध्ये ५० टक्क्यांपेक्षा अधिक ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका आहेत, त्या संपूर्ण जिल्ह्यामध्ये आचार संहिता लागू राहणार आहे. जळगाव जिल्ह्यातही ५० टक्क्यांपेक्षा अधिक ग्रामपंचायतींच्या निवडणुका असल्याने संपूर्ण जिल्हाभरात ही आचारसंहिता लागू राहणार असल्याचे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.