आचारसंहिता गेली उडत...ठायी ठायी मोदी..!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2019 01:08 PM2019-03-18T13:08:00+5:302019-03-18T13:10:07+5:30

सध्या गावोगावी, घरोघरी 'आशा, या आरोग्य महिला कर्मचारी वितरीत करीत असलेल्या आयुष्यमान भारत योजनेत पात्र कुंटुंबाचे ओळखपत्राची. पत्रात पुन्हा मोदी हे एक नव्हे तर तब्बल पाच ठिकाणी विराजमान आहेत.

Code of Conduct has gone ... Modi is .. | आचारसंहिता गेली उडत...ठायी ठायी मोदी..!

आचारसंहिता गेली उडत...ठायी ठायी मोदी..!

Next


जळगाव : व्हिलेज टु व्हिलेज, हाऊस टु हाऊस असाही प्रचार फंडा: लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागली असली तरी सध्या मोदी हे गाव-गाव, घर-घर पोहोचतील अशी सोय आपसुकच झाली आहे. भडगाव तालुकाही त्यास अपवाद नाही. केंद्र सरकारच्या पंचायत राज मंत्रालयातर्फे प्रकाशीत ग्रामोदय संकल्प बातमीपत्र ग्रां.प. तींना पोस्टाद्वारे उशिरात उशीरा आता मिळत आहेत.(कि तशी व्यवस्था केली गेली?.) त्याच्या मुखपृष्टावर राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे खालोखाल मोदी यांची हसरी छबी झळकली आहे. मासिकात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी संसदेत केलेल्या अभिभाषणातून सरकारच्या विकासकामांचा लेखाजोखा मांडला आहे. तीच गोष्ट सध्या गावोगावी, घरोघरी 'आशा, या आरोग्य महिला कर्मचारी वितरीत करीत असलेल्या आयुष्यमान भारत योजनेत पात्र कुंटुंबाचे ओळखपत्राची. पत्रात पुन्हा मोदी हे एक नव्हे तर तब्बल पाच ठिकाणी विराजमान आहेत. त्यात प्रचारवजा मोदी यांनी निरोगी कुंटुंबासाठी ईश्वराकडे केलीली प्रार्थना आहे. हा सर्व पत्रप्रपंच (म्हटल्यास मोदी साहब कि चिठ्ठी..! ) पाहिल्यावर नक्कीच आदर्श आचारसांहितेचे धिंडवडे मात्र निघत आहेत.
दुसरीकडे आचार संहितेमुळे अमळनेर तहसील कार्यालयात लावलेले शासकीय योजनांचे फलक देखील असे कागद लावून झाकण्यात आले आहेत.

Web Title: Code of Conduct has gone ... Modi is ..

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.