थंडीचा कडाका कायम; शेकोट्या लागल्या पेटू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2020 02:37 PM2020-12-27T14:37:50+5:302020-12-27T14:53:42+5:30
डिसेंबर अखेरमध्ये अपेक्षेप्रमाणे थंडीचा तडाखा कायम असून थंडी वाढल्याने ठिकठिकाणी पेटवलेल्या शेकोट्या दिसू लागल्याआहेत.
Next
व सेफ पटेलभुसावळ : डिसेंबर अखेरमध्ये अपेक्षेप्रमाणे थंडीचा तडाखा कायम असून थंडी वाढल्याने ठिकठिकाणी पेटवलेल्या शेकोट्या दिसू लागल्याआहेत. पेटलेल्या शेकोट्या पाहताच रस्त्याने आलेल्या माणसाचे पाय आपोआप शेकोटीकडे उब घेण्यासाठी वळतात.उत्तरेकडील वाहणाऱ्या शीत वाऱ्यांनी शहरातील किमान तापमानात सातत्याने घट होत आहे .हिवाळा सुरू झाल्यापासून यंदा तापमानात सतत चढ-उतार होत असल्याचा अनुभव शहरवासीयांना येत आहे. शहरात रात्रीच्या वेळेस गार वारा वाहत असून दुपारच्यावेळी बोचरी थंडी जाणवत आहे. उन्हात उभे राहून ऊब घेताना नागरिक ठिकठिकाणी दिसत आहेत.थंडीमुळे सकाळी आणि सायंकाळी घराबाहेर निघणे अवघड होत आहे. थंडीमुळे लहान मुले आणि ज्येष्ठांनी विशेष खबरदारी घेतली जात आहे.कसरत करणाऱ्यात वाढथंडी हा आरोग्यदायी ऋतू असतो. यामुळे या ऋतूमध्ये सकाळ-संध्याकाळ शरीरावर मेहनत घेऊन आरोग्याच्यादृष्टीने कसरत करणाऱ्यांच्या संख्यामध्ये वाढ होताना दिसत आहे. शहरातील जिम फूल झाल्या असून, मॉर्निंग वॉकमध्येही नागरिकांची संख्या वाढताना दिसून येत आहे.रब्बी हंगामासाठी थंडीचा फायदा होणार असल्याचे म्हटले जात आहे.थंडीने चांगला जोर धरला असला तरी मागील आठवड्याच्या तुलनेत डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात थंडीची तीव्रता अल्पशी कमी झाली आहे.मागील काही दिवसांत किमान तापमान हे १० ते १४ अंश सेल्सीअसमध्ये स्थिरावले आहे. मागील आठवड्यातदि. २६ - १४℃दि. २५ - १३℃दि. २४ - ११℃दि. २३ - ११℃दि. २२ - १०℃दि. २१ - ११℃असे किमान तापमानाचे स्वरूप होते. दि. ३१ डिसेंबरपर्यंत किमान तापमान हे १२℃ ते १४℃ दरम्यान राहणार आहे.जानेवारीच्या पहिल्या मात्र थंडीचा जोर कमी होण्याचे संकेत आहेत, पण दुसऱ्या आठवड्यात पुन्हा तीव्रता वाढेल, अशी माहिती वेलनेस वेदरचे हवामान अभ्यासक नीलेश गोरे यांनी दिली.चहाचा विक्रीत लक्षणीय वाढशरीरात ऊब राहावी याकरिता थंडीच्या तडाख्यात गरमागरम चहा व भजे ची मजा घेताना नागरिक दिसत आहे. पूर्वीच्या तुलनेत चहा विक्रीमध्ये लक्षणीय वाढ झालेली आहे.सकाळी दाट धुक्याची चादरभल्या पहाटे संपूर्ण परिसरांमध्ये दाट धुक्याची चादर दिसत असून यातून चाकरमान सकाळी-सकाळी कामानिमित्त जाताना दिसत आहे. सध्या ग्रामीण भागामध्ये ग्रामपंचायती निवडणुकीमुळे वातावरण चांगलेच तापले असून रात्रीच्या वेळेस ठिकठिकाणी शेकोट्या पेटवून आपलाच उमेदवार कसा निवडून येईल याविषयी चर्चा होताना दिसत आहे.