येत्या तीन दिवसात जळगावात थंडीची लाट, पारा ८ अंशावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2018 12:44 PM2018-12-28T12:44:22+5:302018-12-28T12:44:45+5:30
१९ किमी प्रतीतास वेगाने वाहताहेत थंड वारे
जळगाव : उत्तरेकडील जम्मु-काश्मिर, उत्तराखंड व हिमाचल प्रदेश या राज्यांमध्ये होत असलेल्या प्रचंड बर्फवृष्टीमुळे उत्तर महाराष्टÑात थंडीची लाट पसरली आहे. जळगाव शहराच्या किमान तापमानात एकाच दिवसात तब्बल ३ अंशाची घट झाली असून, बुधवारी ११ अंश असलेला पारा गुरुवारी ८.४ अंशापर्यंत खाली आला होता. तसेच आगामी तीन दिवस शहरात थंडीची लाट कायम राहणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याकडून वर्तविण्यात आला आहे.
डिसेंबर महिन्यात थंडीची लाट कायम राहीली असून, सरासरी तापमानापेक्षा २ अंशांनी तापमानात घट झाली आहे. दोन दिवस किमान तापमानात वाढ होवून १२ अंशापर्यंत तापमानात वाढ झाली होती. मात्र, उत्तरेकडून येणाऱ्या शीत वाºयांचे प्रमाण वाढल्याने थंडीच्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यातच उत्तरेकडून येणाºया वाºयांचा वेग १७ ते १९ किमी प्रतीतास या वेगाने वाहत आहेत. त्
यामुळे कमाल तापमानातही घट झाली असल्याने दिवसाही गारवा जाणवत आहे. वाºयांचा जोर राजस्थानमधील मेवाड, मध्यप्रदेशातील विंध्य पर्वत लगतच्या भागासह महाराष्टÑातील खान्देश व नाशिक जिल्ह्यात अधिक आहे. त्यामुळेच थंडीच्या प्रमाणात वाढ झाली असल्याची माहिती कुलाबा वेधशाळेतील हवामान तज्ज्ञ निता शशिधरण यांनी दिली.
रब्बी पिके तरारली
डिसेंबर महिन्यात थंडीचा जोर कायम राहिल्यामुळे रब्बी पिकांना चांगलाच फायदा होत आहे. थंडीमुळे ओसचे प्रमाण वाढल्यामुळे हरभरा, गहूला पाणी भरण्याची गरज पडत नाहीय. तसेच कोरडवाहु जमीनीवरील मक्यालाही थंडीचा लाभ मिळत आहे.
हरभºयाला लाभ
सर्वाधिक फायदा हरभरा पिकाला होत असून, हरभºयामध्ये खार चढत आहे. त्यामुळे हरभºयाचा उत्पादनात वाढ होण्याचा अंदाज शेतकºयांकडून लावला जात आहे. यासह उशीरा पेरणी झालेल्या पिकांना देखील फायदा होत असल्याची माहिती कृषीतज्ज्ञ हर्षल चौधरी यांनी दिली.
केळीच्या कांदेबागला मात्र थंडीमुळे नुकसान होण्याची शक्यताही त्यांनी वर्तवली आहे. तर सलग तीन ते चार दिवस किमान पारा ८ अंशापेक्षा कमी राहील्यास हवामान आधारित पिक विमा काढणाºया शेतकºयांना याचा लाभ होणार आहे.
पारा आणखीन घसरणार
आगामी तीन दिवस उत्तर महाराष्टÑात थंडीची लाट कायम राहणार असून, किमान तापमानात घट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शहराचे तापमान ६ अंशापर्यंत खाली जाण्याची शक्यता आहे. तसेच ग्रामीण भागात धुक्याचे प्रमाण देखील वाढले असून, सकाळी ८ वाजेपर्यंत वातावरणात धुके पहायला मिळत आहे. मात्र, जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात बंगालच्या उपसागरावर बनत असलेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यात ढगाळ वातावरण निर्माण होवून थंडीचा जोर कमी होण्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तविण्यात येत आहे.
उत्तरेत सुरु असलेल्या बर्फवृष्टीमुळे उत्तर महाराष्टÑातील नाशिक, जळगाव व धुळे या तीन जिल्ह्यांमध्ये थंडीची पसरली आहे. वाºयांचा वेग अधिक असल्याने थंडीची तीव्रता आणखीन वाढत आहे. आगामी तीन दिवस थंडीची लाट कायम राहणार असून, तीन दिवसानंतर किमान तापमानात वाढ होण्याचा अंदाज आहे.
-निता शशिधरण, हवामान तज्ज्ञ, कुलाबा वेधशाळा