जळगावात तापमान घसरल्याने थंडी परतली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2019 01:24 PM2019-01-28T13:24:34+5:302019-01-28T13:25:09+5:30
१९ किमी वेगाने वाहणाऱ्या थंड वा-यांचा परिणाम
जळगाव : उत्तरेकडून येणाºया थंड वाºयांचा जोर वाढल्याने शहराच्या कमाल तापमानात लक्षणीय घट झाली आहे. तसेच शहरात १९ किमी प्रतीतास वेगाने वाहणाºया थंड वाºयांमुळे शहराचे सरासरी कमाल तापमानात तब्बल ६ अंशाची घट होवून, रविवारी शहराचा कमाल पारा २६ अंशावर आला होता. त्यामुळे जळगावकरांना दिवसादेखील बोचºयाथंडीचाअनुभव आला.
डिसेंबरच्या अखेरच्या आठवड्यात व जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात शहरात आलेल्या थंडीच्या लाटेमुळे जनजीवनावर मोठ्या प्रमाणात परिणाम झालेला पहायला मिळाला. मात्र, गेल्या सात दिवसांपासून किमान तापमानात वाढ झालेली पहायला मिळाली होती. गेल्या आठवड्यात बंगालच्या उपसागरालगत तयार झालेल्या विक्षोभामुळे शहरात ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने कमालसह किमान तापमानात देखील वाढ झाली होती. मात्र, पुन्हा उत्तर भारतात सुरु झालेल्या बर्फवृष्टीमुळे दोन दिवसांपासून किमान व कमाल तापमानात घट झाली आहे. जानेवारीत शहरात कमाल तापमानाची सरासरी ही ३२ अंश इतकी आहे. मात्र, थंड वाºयांमुळे तब्बल ६ अंशाची घट झाली आहे. किमान तापमान मात्र ११ ते १२ अंशावर स्थिर आहे.
जिल्ह्यात पावसाची शक्यता कमीच
बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या विक्षोभामुळे कमी दाबाची एक ट्रफ रेषा छतीसगड, विदर्भापासून कर्नाटकपर्यंत विस्तारली होती. यामुळे विदर्भाच्या अनेक जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस व गारपीट झाली होती. मात्र, विदर्भावरील ट्रफ रेषा उत्तर महाराष्टÑाकडे न सरकता मध्य प्रदेश व झारखंडकडे सरकल्यामुळे जिल्ह्यात सध्यातरी पावसाची शक्यता नसल्याची माहिती कुलाबा वेधशाळेच्या हवामान तज्ज्ञ नीता शशिधरन यांनी ‘लोकमत’ शी बोलताना दिली.
संक्रांतीनंतरही थंडीचा कहर कायम
मकर संक्रांतीनंतर थंडीच्या प्रमाणात घट होवून उन्हाचा चटका वाढण्यास सुरुवात होते, असे म्हटले जाते. मात्र, यंदा वेगळेच चित्र पहायला मिळत असून, संक्रांतीनंतरही थंडीचा जोर कायम असल्याचे दिसून येत आहे.
उत्तरेत सुरु असलेली बर्फवृष्टी हे एकमेव कारण यामागे असून, २००८ मध्ये देखील सक्रांतीनंतर थंडीचा पारा वाढलेला पहायला मिळाला होता. त्यानंतर तब्बल ११ वर्षानंतर जानेवारी अखेरपर्यंत थंडीचा पारा कायम आहे.
दोन दिवस राहणार थंडीचा जोर
उत्तरेत बर्फवृष्टीचा जोर कमी झाल्यामुळे आता जिल्ह्यात देखील थंडीचा जोर कमी होण्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याकडून वर्तविण्यात आला आहे. दरम्यान, बंगालच्या उपसागरावर निर्माण झालेल्या विक्षोभचा परिणाम जिल्ह्यात देखील पहायला मिळणार आहे.
जिल्ह्यात पावसाची शक्यता नसली तरी ढगाळ वातावरण कायम राहणार असल्याने तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे. तसेच सकाळच्या वेळेस जिल्ह्यात दाट धुके देखील पहायला मिळत आहे. धुक्यामुळे रब्बीच्या पिकाला फटका बसण्याची शक्यत असून, हरभºयावरकीड निर्माण होण्याची शक्यता आहे.
पर्यटनावर भर
यंदा राज्यात पावसाने पाठ फिरवल्यामुळे निसर्ग चांगल्याप्रकारे बहरलेला नव्हता. त्यामुळे अनेकांनी पावसाळ्यात पर्यटनाकडे पाठ फिरवली होती. मात्र, यंदा राज्यात थंडीने अनेक वर्षाचा रेकॉर्ड मोडलेला पहायला मिळाला. त्यामुळे थंडीच्या गारव्यात अनेकांनी पर्यटनाची संधी साधलेली पहायला मिळत आहे. कोकण, गोवा, महाबळेश्वर, नाशिक या ठिकाणी जाण्यास जिल्ह्यातील पर्यटकांचा भर दिसून येत आहे.
उत्तरेकडून येणाºया थंड वाºयांचा वेग जास्त असल्याने जळगाव जिल्ह्यातील कमाल तापमानात घट झाली आहे. तसेच अजून दोन दिवस थंडीचा जोर कायम राहू शकतो. मात्र, या आठवड्यात जिल्ह्यात बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या विक्षोभामुळे ढगाळ वातावरण देखील पहायला मिळणार असून, त्यामुळे थंडीचा जोर कमी होणार आहे.
-नीता शशिधरन, हवामान तज्ज्ञ, कुलाबा वेधशाळा