महाराष्ट्र बंदमुळे जळगाव एस.टी.महामंडळाचे ७० लाखांचे उत्पन्न बुडाले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2018 04:29 PM2018-08-10T16:29:15+5:302018-08-10T16:32:40+5:30

The collapse of Maharashtra caused the loss of Jalgaon ST Mahamandal's revenue of 70 lakhs | महाराष्ट्र बंदमुळे जळगाव एस.टी.महामंडळाचे ७० लाखांचे उत्पन्न बुडाले

महाराष्ट्र बंदमुळे जळगाव एस.टी.महामंडळाचे ७० लाखांचे उत्पन्न बुडाले

Next
ठळक मुद्देदुसऱ्या दिवशी पहाटेपासून सेवा सुरुजळगाव जिल्ह्यातील ११ डेपोला बसला फटकादिवसभरात झाल्या होत्या ३१७२ फे-या रद्द

जळगाव : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदचा सर्वांधिक फटका एसटी महामंडळाला बसला असून, महामंडळाच्या जळगाव विभागातील ११ डेपोचें दिवसभरातील ७० ते ७५ लाखांचे उत्पन्न बुडाले आहे. दरम्यान, सकाळपासून जागेवरच उभ्या असलेल्या बसेस वातावरण निवळल्याने पहाटेपासूनच बाहेर गावच्या फे-यांना सुुरुवात झाली.
राज्यासह जिल्ह्यातील मराठा समाज बांधवांनी सकाळपासूनच बंदचे आवाहन केल्याने, जळगावसह जिल्हाभरातील डेपोंमधील वाहतूक सकाळी सातपासूनच ठप्प झाली होती. जिल्हाभरातील जळगाव, भुसावळ, मुक्ताईनगर, चाळीसगाव, चोपडा, यावल, अमळनेर, जामनेर, एरंडोल, रावेर, पाचोरा या डेपोंमधून सकाळी ५ ते दुपारी रात्री पर्यंतच्या एकूण ३१७२ फेºया रद्द झाल्या होत्या. या सकाळच्या सत्रातील एकूण १५३२ फेºयांपैकी केवळ १३९ फे-या धावल्या होत्या. सकाळपासूनच महामंडळाच्या फे-या रद्द झाल्यामुळे, प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात हाल झाले होते.

Web Title: The collapse of Maharashtra caused the loss of Jalgaon ST Mahamandal's revenue of 70 lakhs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव