सकल जैन संघातर्फे १४१ बाटल्यांचे रक्त संकलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2021 04:14 AM2021-04-26T04:14:42+5:302021-04-26T04:14:42+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : सकल जैन श्री संघातर्फे भगवान महावीर जयंती विविध उपक्रमांनी साजरी झाली. यावेळी महावीर जन्म ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : सकल जैन श्री संघातर्फे भगवान महावीर जयंती विविध उपक्रमांनी साजरी झाली. यावेळी महावीर जन्म कल्याणक महोत्सवाचे आयोजन केले होते. यावेळी घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात १४१ बाटल्यांचे रक्त संकलन झाले. तर दहा प्लाझ्माचेही दान केले. यंदा कोरोनामुळे सर्व धार्मिक कार्यक्रम रद्द असल्याने, जैन समाज बांधवांनी घरीच भगवान महावीरांचे स्मरण करीत कोरोनाचे संकट दूर करण्यासाठी प्रार्थना केली.
महावीर जयंती निमित्त रविवारी महिलांसाठी विविध ऑनलाईन स्पर्धाचे आयोजन केले होते. भारती रायसोनी यांनी सदा ज्ञान भक्ती गान मंडळच्या माध्यमातून ऑनलाईनद्वारे भजन संध्या सादर केली. तत्पूर्वी सर्वात जुन्या वासुपूज्य जैन मंदिरात सकाळी ध्वजारोहण झाले. या ध्वजारोहणाचे ऑनलाईन प्रसारण करण्यात आले होते. यावेळी युवाचार्य प्रवर महेंद्रऋषीजी म.सा.यांचे मार्गदर्शन लाभले. या कार्यक्रमाला संघपती दलीचंद जैन, माजी मंत्री सुरेशदादा जैन, माजी खासदार ईश्वर ललवाणी, जैन उद्योग समुहाचे अध्यक्ष अशोक जैन, माजी नगराध्यक्ष प्रदीप रायसोनी, भागचंद वेदमुथा, माणकचंद बेद, राजेश श्रावगी यांनी ऑनलाइनद्वारे शुभेच्छा दिल्या.
रक्तदान शिबिराचे आयोजन
सकल जैन श्री संघ व जैन सोशल ग्रुप गोल्ड यांच्या संयुक्त विद्यमाने महावीर जयंतीनिमित्त २१ ते २५ एप्रिल दरम्यान कांताई सभागृह येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराला भवरलाल अँड कांताबाई जैन मल्टीपर्पज फाउंडेशनचे सहकार्य मिळाले. शिबाराचे उद्घाटन पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे व डॉ.अमृता मुंढे यांच्याहस्ते झाले.
शिबिरात जैन समाजातील युवक-युवतींनी रक्तदान करून १४१ बाटल्यांचे रक्त संकलन केले. शिबिराच्या समारोपाला पालकमंत्री गुलाबराव पाटील, महापौर जयश्री महाजन, माजी नगरसेवक अमर जैन उपस्थित होते.
यशस्वितेसाठी अध्यक्ष दलुभाऊ जैन, संजय रेदासनी, विशाल चोरडीया, प्रियेश छाजेड, आनंद श्रीश्रीमाळ, मुकेश सुराणा, सचिन चोरडीया, नरेंद्र बंब, अनिल पगारिया, हर्षाली पारख, विपीन चोरडीया, अमोल श्रीश्रीमाळ, सचिन बाफना, किशोर चोपडा आदीनी परिश्रम घेतले.
इन्फो :
जैन युवा फाउंडेशनतर्फे गो माता पूजन
महावीर जयंतीनिमित्त जैन युवा फाउंडेशनतर्फे सकाळी पांजरापोळ संस्थानातील गो-शाळेत गो माता पूजन करून लापसी दान करण्यात आली. यावेळी सुभाषचंद्र, प्रवीण व प्रमोद पगारिया यांच्याकडून गरिबांना अन्नदान करण्यात आले. तर संघपतींच्या हस्ते या निमित्ताने झेंडावंदन करण्यात आले. यावेळी दिलीप गांधी, स्वरुप लुंकड, मनोज लोढा, प्रवीण पगारिया, जैन युवा फाउंडेशनचे अध्यक्ष जयेश ललवाणी, सेक्रेटरी रितेश पगारिया, कोषाध्यक्ष अमोल फुलफगर, प्रवीण छाजेड, दर्शन टाटिया, रिकेश गांधी, पीयूष संघवी, आनंद चांदीवाल, सुशील छाजेड, विनय गांधी, राहुल बांठिया, अनूप जैन, अनिल सिसोदिया, अमोल श्रीश्रीमाळ, गौरव गांधी, आशिष कांकरिया, संदीप सुराणा आदी उपस्थित होते.
इन्फो :
महापौरांच्या हस्ते राका कुटुंबियांचा गौरव
''सेवा परमो धर्म:'' ही भगवान महावीर स्वामींची शिकवण अंगीकारत गेल्या वर्ष भरापासून १०० हून अधिक लोकांना राका परिवार सात्विक भोजन देत असल्याने महापौर जयश्री महाजन यांनी महावीर जयंतीनिमित्ताने राका परिवाराचा गौरव केला. यात राका परिवारातील सुशिला राका, अपूर्वा राका, अतुल राका, डॉ. दिशा राका, ईशान राका, लता थोरात, सोनी काळे, वैशाली चिमणकर यांचा पुष्पगुच्छ देऊन महापौरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. यावेळी माजी नगरसेवक अमर जैन, ललित धांडे उपस्थित होते.