जिल्हाधिका:यांची खुर्ची व वाहन जप्ती टळली

By admin | Published: February 17, 2017 11:29 PM2017-02-17T23:29:01+5:302017-02-17T23:29:01+5:30

वाढीव मोबदला देण्यास टाळाटाळ : दोन दिवसात न्यायालयात रक्कम भरण्याचे आश्वासन

Collector: Their chair and vehicle confiscation were avoided | जिल्हाधिका:यांची खुर्ची व वाहन जप्ती टळली

जिल्हाधिका:यांची खुर्ची व वाहन जप्ती टळली

Next

जळगाव : पाचोरा तालुक्यातील साजगाव-मोहाडी लघु पाटबंधारे योजनेसाठी 10 एकर जमीन संपादित करून त्याचा 38 लाख 74 हजार 528 रुपयांचा वाढीव मोबदला देण्यास टाळाटाळ केल्याप्रकरणी न्यायालयाने जिल्हाधिका:यांची खुर्ची व वाहन जप्त करण्याचे आदेश दिले. मात्र दोन दिवसात रक्कम भरण्याचे आश्वासन जिल्हाधिका:यांनी दिल्यानंतर शेतक:यांनी कारवाई थांबविली. त्यामुळे खुर्ची व वाहन जप्तीची नामुष्की टळली.
साजगाव-मोहाडी लघु पाटबंधारे योजनेसाठी 1 जानेवारी 1995 रोजी सिकंदर अमिर पिंजारी यांच्या मालकीच्या 10 एकर जमिनीचे भूसंपादन केले होते. शेतक:यांनी जिल्हा न्यायालयात वाढीव मोबदल्यासाठी याचिका दाखल केली होती. त्यानुसार 2008 मध्ये जिल्हा न्यायालयाने शेतक:यांना वाढीव मोबदला देण्याचे आदेश शासनाला दिले होते. मात्र शासनाकडून वाढीव मोबदला देण्यासाठी टाळाटाळ होत होती. या संदर्भात शेतक:यांनी न्यायालयात पुन्हा अर्ज करून जिल्हाधिका:यांची खुर्ची व वाहन जप्त करण्याचे आदेश व्हावे अशी मागणी केली होती. त्यानुसार न्यायालयाने वॉरंट काढले होते. या वॉरंटच्या अंमलबजावणीसाठी शुक्रवारी सकाळी 11 वाजेच्या सुमारास शेतकरी सिकंदर अमिर पिंजारी, युनूस पिंजारी, मन्सूर पिंजारी, अॅड.अशोक चौधरी व न्यायालयातील अधिकारी व कर्मचारी जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झाले. सुरुवातीला त्यांनी निवासी उपजिल्हाधिकारी राहुल मुंडके यांची भेट घेऊन कारवाईची माहिती दिली. मुंडके यांनी शेतक:यांना दोन दिवस थांबण्याची विनंती केली. त्यानंतर जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल या कार्यालयात आल्या.
अॅड.अशोक चौधरी यांच्यासह शेतक:यांनी त्यांची भेट घेत न्यायालयाच्या आदेशाची प्रत त्यांना दाखविली. जिल्हाधिका:यांनी दोन दिवसात शेतक:यांच्या               मोबदल्याची रक्कम अदा करण्याचे आश्वासन दिले. शेतक:यांनी दोन दिवसांची मुदत दिल्यामुळे जिल्हाधिका:यांची खुर्ची तसेच वाहन जप्तीची नामुष्की टळली.
टाळाटाळ करणा:यांवर कारवाई करा
शेतक:यांच्या वाढीव मोबदल्याची रक्कम तीन महिन्यांपूर्वी शासनाने जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठविली आहे. त्या आशयाचे शासन आदेशदेखील आहेत. मात्र तीन महिने ही रक्कम देण्यासाठी टाळाटाळ कुणी केली या प्रकाराची चौकशी करावी. तीन महिन्याचे व्याज कुणी द्यावे त्याबाबतची माहिती स्पष्ट करून टाळाटाळ करणा:यावर कारवाई करावी, अशी मागणी अॅड.अशोक चौधरी यांनी केली.

जमिनीचा मोबदला देण्याबाबत टाळाटाळ होत असल्याने आज न्यायालयाच्या आदेशानुसार जिल्हाधिकारी यांची खुर्ची व वाहन जप्तीसाठी आम्ही आलो होतो. मात्र दोन दिवसात रक्कम भरण्याचे आश्वासन जिल्हाधिका:यांनी दिले आहे. सोमवारी रक्कम न मिळाल्यास जप्तीची कारवाई आम्ही करणार आहोत.
-अॅड.अशोक चौधरी, याचिकाकत्र्याचे वकील

Web Title: Collector: Their chair and vehicle confiscation were avoided

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.