प्रलंबित अहवालांबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2021 04:11 AM2021-05-03T04:11:34+5:302021-05-03T04:11:34+5:30

जळगाव : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात असलेल्या कोरोना विषाणू नमुने तपासणी प्रयोगशाळेच्या कामकाजाबाबत जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी शनिवारी ...

The Collector took stock of the pending reports | प्रलंबित अहवालांबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा

प्रलंबित अहवालांबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा

Next

जळगाव : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात असलेल्या कोरोना विषाणू नमुने तपासणी प्रयोगशाळेच्या कामकाजाबाबत जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी शनिवारी आढावा घेतला. यावेळी प्रलंबित अहवालांबाबत चर्चा करण्यात आली व याबाबतच्या अडचणी तातडीने सोडवाव्यात, अशा सूचना जिल्हाधिकारी राऊत यांनी दिल्या. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात सूक्ष्मजीवशास्त्र विभागात विषाणू निदान व संशोधन प्रयोगशाळा कार्यरत आहे. प्रयोगशाळा महत्त्वाची भूमिका बजावत असून १ लाख ७५ हजारांच्या वर कोरोनाच्या नमुना तपासण्यांची संख्या आजवर पोहोचली आहे. आढावा बैठकीदरम्यान मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील, प्रभारी अधिष्ठाता डॉ. मारोती पोटे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण, जिल्हा सूचना व विज्ञान अधिकारी प्रमोद बोरोले आदी उपस्थित होते.

मनुष्यबळाची घेतली माहिती

प्रयोगशाळेतील मनुष्यबळाच्या उपलब्धतेबाबत त्यांनी माहिती घेतली. तसेच त्यांच्या कामकाजाची माहिती घेतली. काही अहवाल हे तांत्रिक कारणास्तव प्रलंबित राहत आहे, या तांत्रिक अडचणी दूर कशा होतील याविषयी जिल्हाधिकारी, सीईओ यांच्यासह प्रमोद बोरोले यांनी मार्गदर्शन केले. यावेळी वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रशांत देवरे, उपवैद्यकीय अधीक्षक डॉ. संगीता गावित व डॉ. विलास मालकर, डॉ. इम्रान पठाण, डॉ. योगिता बावस्कर, डॉ. चेतन भंगाळे उपस्थित होते.

Web Title: The Collector took stock of the pending reports

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.