जिल्हाधिकाऱ्यांची रात्रीच कोरोना रुग्णालयात धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2020 11:54 AM2020-06-22T11:54:44+5:302020-06-22T11:54:48+5:30

जळगाव : जिल्ह्यात दररोज कोरोना रुग्णांची संख्या वाढतच असून याला रोखण्यासाठी कडक पावले उचलली जात आहे. यात केंद्रीय समितीकडून ...

The collector was rushed to Corona Hospital at night | जिल्हाधिकाऱ्यांची रात्रीच कोरोना रुग्णालयात धडक

जिल्हाधिकाऱ्यांची रात्रीच कोरोना रुग्णालयात धडक

Next

जळगाव : जिल्ह्यात दररोज कोरोना रुग्णांची संख्या वाढतच असून याला रोखण्यासाठी कडक पावले उचलली जात आहे. यात केंद्रीय समितीकडून आढावा घेऊन आरोग्य यंत्रणेना उपाययोजनांबाबत सूचना दिल्या जात असतानाच आरोग्य यंत्रणा सतर्क आहे की नाही याची पाहणी करण्यासाठी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी शनिवारी रात्री साडे दहावाजेनंतर कोरोना रुग्णालयाला अचानक भेट दिली. या वेळी त्यांनी कक्षांची झाडाझडती घेतली. कोरोना रुग्ण संख्येला आळा बसणे आवश्यक असल्याने यंत्रणा अधिक सक्षम करण्यासाठी जिल्हाधिकारी पदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर सलग दोन दिवस जिल्हाधिकारी राऊत यांनी कोरोना रुग्णालयास भेट दिली आहे. यात पहिला दिवस नियोजित पाहणी दौरा होता, मात्र शनिवारी रात्री अचानक भेट दिल्याने आरोग्य यंत्रणेची चांगलीच तारांबळ झाली.
जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढण्यासह मृत्यूदरही जास्त असल्याने उपाययोजनांबाबत राज्यस्तरावरून उपाययोजना केल्या जात आहेत. यात केंद्रीय समितीदेखील जळगावात आढावा घेत आहे. त्यात आता गुरुवारी रात्री जिल्हाधिकारी पदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर शुक्रवारी जिल्हाधिकारी अभिजत राऊत यांनी कोरोना रुग्णालयाला भेट दिली होती. या भेटी दरम्यान रुग्णांसोबत त्यांचे नातेवाईक असल्याचा गंभीर प्रकार आढळून आला होता. या सोबतच याच दिवशी रुग्णालयातून एक रुग्ण बेपत्ता झाला होता. त्यामुळे रुग्णालयात कामकाज चालते तरी कसे तसेच रुग्णांच्या नातेवाईकांचा वावर अद्यापही सुरूच आहे का, रुग्णांकडे लक्ष दिले जात आहे की नाही याची पाहणी करण्यासाठी दुसºया दिवशी पुन्हा शनिवारी रात्री रुग्णालयात अचानक धडक दिली. या वेळी डॉक्टर, कर्मचारी यांची चांगलीच तारांबळ उडाली.

रुग्णांवर लक्ष ठेवणेही आवश्यक
-कोरोनाच्या संकटात रुग्णालयात डॉक्टरांनी उपस्थित असणे अपेक्षित आहे. तसेच केवळ उपस्थित राहून उपयोग नाही तर प्रत्येक रुग्णावर लक्ष ठेवणेही गरजेचे आहे, अशा सूचना जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी आरोग्य यंत्रणेला दिल्या.
-कोरोना रुग्णालयात रुग्णांवर योग्य उपचार केले जातात किंवा नाही यांची पाहणी करण्यासाठी जिल्हाधिकारी राऊत यांनी शनिवारी रात्री कोरोना रुग्णालयाची पाहणी केली.रविवारी दुपारी अधिष्ठाता डॉ. रामानंद यांच्यासोबत चर्चा केली. ४या सोबतच जिल्हाधिकारी राऊत यांनी केंद्रीय समितीचे प्रमुख, आरोग्य व कुटुंब कल्याण विभागाचे (ओएचएफडब्ल्यू) वरिष्ठ विभागीय संचालक डॉ. ए. जी. अलोने, केंद्रीय समितीचे सदस्य, सार्वजनिक आरोग्य विभागाचे सल्लागार डॉ.एस.डी. खारपाडे यांच्यासोबतही चर्चा केली. समितीने शनिवारी पाहणी केलेल्या ठिकाणांविषयी चर्चा होऊन जिल्ह्यात उपाय योजनांसंदर्भात देखील चर्चा झाली.

केंद्र्रीय पथकाची डॉ. उल्हास पाटील रुग्णालयास भेट
जळगाव : डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयास रविवारी केंद्रीय समितीने भेट देऊन याठिकाणी कोरोना रुग्णांवर सुरू असलेल्या उपचाराची माहिती घेतली. रुग्णांवर होणारे उपचार आणि मिळणाºया सुविधा पाहून केंद्रीय समितीने समाधान व्यक्त केले.
जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. यासोबतच मृत्यूदरदेखील वाढला आहे. राज्यात सर्वाधिक मृत्यूदर जळगावात असल्याने त्याची दखल थेट केंद्र सरकारने घेतली आहे. गेल्या आठवड्यातच डेथ आॅडीट कमिटीचा अहवाल तत्कालिन जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी सादर केला. या अहवालानंतर केंद्र सरकारचे पथक २० जून रोजी जळगावात दाखल झाले. पथकाचे प्रमुख ओएचएफडब्ल्युचे वरिष्ठ विभागीय संचालक डॉ. ए.जी. अलोने यांच्या मार्गदर्शनाखाली या पथकाने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास भेट दिली होती. त्यानंतर रविवारी या पथकाने डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयास भेट दिली. या भेटीत त्यांनी कोरोना वॉर्डसह संशयित रुग्णांच्या कक्षाचीदेखील पाहणी केली. याठिकाणी रुग्णांना मिळणारे उपचार आणि उपलब्ध करून देण्यात आलेल्या सुविधा याविषयी त्यांनी समाधान व्यक्त केले. तसेच काही सूचनादेखील त्यांनी केल्या.
केंद्रीय पथकाचे प्रमुख डॉ. ए.जी. अलोने यांच्यासह डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. एन.एस. आर्वीकर, वैद्यकीय अधीक्षक डॉ. चंद्रय्या कांते, रजिष्ट्रार प्रमोद भिरूड, जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. एन.एस. चव्हाण उपस्थित होते.

Web Title: The collector was rushed to Corona Hospital at night

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.